ile photo 
विदर्भ

लाखनीत झाला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपी व्हॅनचालकास अटक

सकाळ वृत्तसेवा

लाखनी (जि. भंडारा) : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका प्राध्यापिकेला पेट्रोल ओतून जाळण्याची घटना ताजी असतानाच भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्‍यात एका शिक्षेकेच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. मात्र शिक्षिकेच्या समयसूचकतेने तिचा अपहरणाचा प्रयत्न टळला.

लाखनी तालुक्‍यातील खेडेगावातील युवती खासगी कान्व्हेंटमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी ती शाळेत येत असताना विद्यार्थी आणणाऱ्या व्हॅनचालकाने बसस्थानकासमोर पीडिता व तिच्या मैत्रिणीस गाडीत बसविले. नंतर बाजार समितीसमोर व्हॅन थांबवून पीडितेच्या मैत्रिणीस उतरविले.

अपहरणकर्ता पळाला

तेव्हा पीडितेनेसुद्धा व्हॅनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी आशीष टेंभुर्णे याने पीडितेला जबरदस्तीने पुन्हा व्हॅनमध्ये बसविले. तू दुसऱ्यासोबत लग्न कशी करतेस? असे विचारून त्याने तिचे केस ओढून व्हॅनमधून पळवून नेले. त्यानंतर तिला मानेगावमार्गे आलेसूर, मासलमेटा, खेडेपारवरून लाखोरी येथे आणले. तेथे संजय नगर परिसरात पीडितेस उतरविले. त्यानंतर तो व्हॅनसह पळून गेला.

पीडितेने नोंदवली तक्रार

या घटनेची माहिती पीडितेने कुटुंबीयांना दिली. त्यांच्यासोबत पोलिस ठाण्यामध्ये येऊन आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी तुकाराम काटे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू केला.


सिंधीपार येथून आरोपीला अटक

पोलिसांनी रात्री दीड वाजताच्या सुमारास सिंधीपार येथे नातेवाईकाच्या घरून आरोपीला अटक केली. त्याच्या विरुद्ध अपहरण, विनयभंग, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार, पोलिस हवालदार भगवान थेर, पोलिस नायक सुभाष हटवार करीत आहेत. आरोपी हा विवाहित असून त्याला एक मुलगा व एक मुलगीसुद्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT