Knife attack on deputy tehsildar by sand smugglers Yavatmal crime news 
विदर्भ

बापरे! वाळू तस्करांनी नायब तहसीलदारांच्या पोटावर चाकूने केले सपासप वार

राजकुमार भीतकर-अनिल काळबांडे

उमरखेड (जि. यवतमाळ) : अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यास गेलेले उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर शनिवारी (ता. २२) रात्री ११ वाजताच्या सुमारास उमरखेड ते ढाणकी रोडवर वाळू तस्करांकडून चाकूहल्ला करण्यात आला. यामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खडबळ उडाली आहे.

नायब तहसीलदार वैभव पवार यांच्या पोटावर चाकूने वार केल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर तत्काळ उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली आहे.

त्यांनी संशयित आरोपी अविनाश चव्हाण व इतर साथीदारांवर कडक कलम लावून कडक कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. तसेच नायब तहसीलदार आणि तलाठी यांची प्रकृती चांगली असून त्यांना जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.

वाळूमाफियांना अभय कुणाचे?

जिल्ह्यातील वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. २० पैकी काही घाटांचे लिलाव झाले आहेत. त्यामुळे वाळूची तस्करी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असताना वाळूघाटांचे लिलाव पूर्ण का केले जात नाही, हे एक कोडेच आहे. जिल्ह्यातील प्रशासनाचे वाळूमाफियांना अभय असल्यानेच व प्रशासनात दलालांची ढवळाढवळ वाढल्याने वाळूमाफियांनी डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे. याकडे शासनाने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : हायकोर्टाच्या परीक्षेत गडबड, कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी अडवली न्यायाधीशांची गाडी

SCROLL FOR NEXT