Knife attack at Yavatmal
Knife attack at Yavatmal 
विदर्भ

हवेत गोळीबार केल्याने गेला तुरुंगात, परत आल्यावर केले असे कृत्य

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एक युवक सहा महिन्यांपूर्वी सिगारेट विकत घेण्यासाठी परिसरातील दुकानात गेला. मात्र, पैसे नसल्याने दुकानदाराला उसणवारीवर सिगारेट मागितली. दुकानदाराने सिगारेट देणाया नकार दिला. यामुळे चिडलेल्या युवकाने हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराच्या तक्रारीवरून युवकाला अटक करण्यात आली. कारागृहातून बाहेर येताच त्याने दुकानदाराला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आलिशान अहेमद मोहंमद फारुख (वय 26) असे आरोपी युवकाचे नाव आहे.  
 
शकील अन्सारी मोहंमद आकील अन्सार (रा. अन्सानगर) यांचे अन्सारनगर परिसरात किराणा दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वी आलिशान अहेमद मोहंमद फारुख (वय 26) युवक उधार सिगारेट मागण्यासाठी शकील अन्सारी यांच्या दुकानात गेला होता. त्याला उधारीसाठी तेव्हा नकार दिल्याने आलिशानने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी तो कारागृहात होता. काही दिवसांपूर्वीच तो जामीनावर बाहेर आला.

शनिवारी (ता. 18) शकील अन्सारी हे कचरा फेकण्यासाठी दुकानाच्या बाहेर आले असता आलिशान अहेमत याने संधी साधून बेसावध असलेल्या शकील यांच्यावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  जखमीची पत्नी रुबिना शकील अन्सारी यांनी नागपुरीगेट ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीतून पोलिसांनी आलिशान अहेमदविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. रविवारी (ता. 19) त्यास न्यालयासमोर हजर केले.

आरोपींना राहिली नाही भीती

एका व्यक्तीला धमकावण्यासाठी हवेत गोळीबार केल्यामुळे तुरुंगात जावे लागले. कारागृहातून बाहेर येताच त्याच व्यक्तीवर पुन्हा चाकू हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेवरून आरोपींना कोणत्याही प्रकारची भीती नसल्याचे दिसून येते . कायदा आणि पोलिसांचा त्यांना धाकच राहिला नसल्याचे या घटनेवरून समोर येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT