file 
विदर्भ

मुलीच्या अंगावर पाणी सांडल्यावरून चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा

टेकाडी (जि.नागपूर) ः वर्गातील मुलीच्या अंगावर पाणी सांडल्याच्या निमित्ताने सोळा वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यांवर वर्गातीलच एकाने चाकूने वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी (ता. 17) रात्री आठच्या सुमारास घडली. घटनेतील मारेकरी तिन्ही विधिसंघर्ष बालकांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गुन्ह्यांतर तिघेही आरोपी नागपूरला पसार झाले होते. कन्हान पोलिसांनी आरोपींना मंगळवारी शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तिन्ही मारेकरी विधिसंघर्ष बालक पोलिसांच्या ताब्यात
तिन्ही बालक कन्हान येथील असून विधिसंघर्ष आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या तिन्ही आरोपींनी सोळा वर्षीय केतन संजय पगारे (रा. राधाकृष्णनगर, कन्हान) याच्यावर चाकूने वार केला. त्यात केतन जखमी झाला. आरोपी घटनास्थळावरून लगेच पसार झाले होते. जखमी केतन पगारे हा धर्मराज विद्यालय कन्हान येथे दहाव्या वर्गात शिकतो. सोमवारी शाळा आटोपल्यानंतर शिकवणीवर्ग करून तो घरी परतत होता. शिकवणीवर्गात शुभम (काल्पनिक नावे) त्याच्या शिकवणीवर्गात "बॅचमेट' होता. शिकवणीवर्गात केतन याच्या हातातून एका मुलीच्या अंगावर पाणी सांडले. त्यावर केतन आणि शुभम यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शिकवणीवर्ग संपल्यानंतर शुभमने घडलेला प्रकार राहुलला सांगितला. यावर भूमेश याने त्याचा भाऊ कमल याला सोबत घेऊन केतन याच्यावर शिवनगर येथे चाकूने सपासप वार केले. त्याच्या शरीरावर चार जबर घाव करून केतनला जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात केतनला रस्त्यावर टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनुसार मारेकरीदेखील जास्त वयाचे नसून अल्पवयीन असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी केतनला मेयो रुग्णालयात उपचारारार्थ हलविले. घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला. मंगळवारी तिन्ही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी पूजलवार यांच्या मार्गदर्शनात एपीआय नंदा पाटील, अमितकुमार आत्राम, वीरेंद्रसिंह चौधरी, आतिश मानवटकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT