छायाचित्र
छायाचित्र 
विदर्भ

नागपूरची एज्युकेशन हब म्हणून ओळख

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रस्ते, पाणी, वीज त्यासोबतच सर्वांसाठी आरोग्य आदी पायाभूत सुविधांमुळे नागपूरसह ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्या आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक संस्थांमुळे जगातील व देशातील विद्यार्थी येथे आकृष्ट होत आहे. त्यामुळेच एज्युकेशन हब म्हणून नागपूरची सर्वत्र ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, महानगर आयुक्त शीतल उगले, वस्त्रोद्योग संचालक माधवी खोडे, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. तीन मोबाईल सर्व्हेलन्स व्हेईकल व ड्रोनचे उद्‌घाटन करण्यात आले.
राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या प्रत्येक कुटुंबाला संपूर्ण मदत तसेच पिण्याच्या पाण्यासोबत जीवनावश्‍यक साहित्य पुरविण्यास प्राधान्य दिले आहे. अपुऱ्या व अनियमित पावसामुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तोतलाडोह व पेंच प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कन्हानचे पाणी टनेलद्वारे तोतलाडोहपर्यंत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी भरीव निधीही उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
झुडपी जंगलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी विभागातील झुडपी जंगल अंतर्गत येणाऱ्या जागेसंदर्भातील अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत 72 हजार 996 हेक्‍टर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT