Kondhali News
Kondhali News  sakal
विदर्भ

Kondhali : पाण्याच्या शोधात नीलगाय घुसली सरपंचाच्या घरात

सकाळ वृत्तसेवा

Kondhali News : वन्यप्राणी आणि मानवी संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत असून वन्यप्राणी जिवाच्या आकांताने गावाकडे धाव घेत आहे. नजीकच्या दुधाळा येथे नीलगाय जीव वाचविण्यासाठी चक्क सरपंचाच्या घरात शिरली. बुधवारी, (ता.१०) सकाळी हा प्रकार अचानक घडल्याने गावकऱ्यांना धक्काच बसला. तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी नीलगायीला पकडून जंगलात सोडले.

वनपरिक्षेत्र कोंढाळी वनक्षेत्रातील वाघ, बिबट, अस्वल, रानडुकरे या सारखे हिंस्र प्राणी तसेच नीलगाय (रोही), हरिण, माकड, मोर, कोल्हे, वन्यप्राण्याची संख्या मोठी आहे. मात्र, हे वन्यप्राणी गावात धुडगूस घालीत आहेत.

गेल्या काही वर्षांत जंगलात पाणीटंचाई निर्माण झाल्याने वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. तर दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी व पशुपालक मात्र पूर्णतः मेटाकुटीला आला आहे.

जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी बांधलेल्या टाक्यामधील पाणी पिण्यासाठी कामठी, मासोद जाटलापूर,धुरखेडा, बिहालगोंदी गावात वाघ आणि बिबट पोहचत आहे. त्याचप्रमाणे पांजरा काटे जंगल लगतच्या भागात रोही नीलगायीचे थवेच्या थवे आहेत.

आज, सकाळी नऊच्या सुमारास नीलगाय जंगलातून भटकले व कोंढाळी लगतच्या दुधाळा गावात पोहोचले. दुधाळा गावात पोहोचल्यावर येथील कुत्र्यांनी नीलगायी पाठलाग केला. यात नीलगाय जखमी अवस्थेत सैरावैरा पळत सुटले.

दुधाळा गावातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडून नीलगायीने सरपंच प्रकाश गुजर यांचे घर गाठले व त्यांच्या घरातील जाऊन ठाण मांडले ‌.जखमी नीलगाय सरपंचाचे घरात घुसल्याची माहिती वन विभागला देण्यात आले.

वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांच्या सूचनेनुसार वनरक्षक प्रियंका पाटील, वनरक्षक सूरज बेले, राजू लाखाडे, वन कामगार किशोर कुसळकर, पुंडलिक सरोदे यांनी सरपंच प्रकाश गुजर यांचे घर गाठले.

जखमी अवस्थेत असलेल्या नीलगाय (नर) याला गावकऱ्यांचे सहकार्याने ताब्यात घेऊन वन विभागाच्या वाहनाने पशुवैद्यकीय दवाखाना कोंढाळी येथे आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील रेवतकर व सहाय्यक सुधीर कापसीकर यांनी जखमी नीलगायीवर प्राथमिक उपचार केले. वन‌विभागाचे कर्मचाऱ्यांनी जंगलात‌ नेऊन सोडले.

पाण्यासाठी वन्यप्राणी गावात

जंगलातील पाण्याचे साठे आटल्याने आता वन्यप्राणी थेट गावाकडे धाव घेत आहेत. नीलगायसुद्धा पाण्याच्या शोधात फिरत असताना महामार्गावर आले.

वाहनाचे ताफे पाहून घाबरले आणि सैरभैर फिरू लागले. शेवटी महामार्ग ओलांडून दुधाळा गावात आले. तिथे आल्यावर थेट सरपंचाच्या घरात शिरले. जंगलात पाणी नसल्यामुळे वन्यप्राणी गावात येत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT