A laborer died after falling from the tenth Floor 
विदर्भ

स्लॅबच्या कामादरम्यान दहाव्या माळ्यावरून पडला मजूर आणि...

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : इमारतीच्या दहाव्या माळ्यावर काम करीत असताना तोल गेल्याने पहिल्या माळ्यावर पडून मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.आठ) दुपारी दुपारदरम्यान गवळीपुरा येथे घडली.

संजू सरदार कालीवाले (वय 25, रा. गवळीपुरा) असे मृताचे नाव आहे. गवळीपुरा येथे शहरातील एका व्यावसायिकाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आज स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. काम करीत असताना मजुराचा तोल गेल्याने दहाव्या माळ्यावरून पहिल्या माळ्यावर पडला. ही घटना लक्षात येताच कामावरील मजूर व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

उपचारासाठी त्याला तत्काळ वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तपासणी करताच डॉक्‍टरांनी संजूला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांत याप्रकरणी आकस्मिक नोंद करण्यात आली. तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार धनंजय सायरे यांनी दिली.


मजुरांचा जीव धोक्‍यात

शहरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारतीचे काम सुरू आहे. या कामांवर मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत नाही. परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांना आपला जीव धोक्‍यात घालूनच काम करावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel Conflict : तेहरान अंधारात ! इस्रायली हल्ल्यानंतर इराणमध्ये वीजपुरवठा ठप्प, मध्यपूर्वेत तणाव शिगेला

Nagpur News: क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवासाठी जि.प. कडून २० लाखांची तरतूद

Shikhar Shinganapur Yatra: कावडींचा आज मुंगी घाटात थरार! काळगावडे राजेंनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन, शिखर शिंगणापूर यात्रेत उत्साह..

Sangli Crime : सांगली हादरली! जुन्या वादाचा भयानक शेवट; वाळव्यातील तरुणाचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून

Nagpur News: दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर सेवाज्येष्ठतेत बदल नाही; उच्च न्यायालय ; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला दिलासा नाकारला

SCROLL FOR NEXT