file photo 
विदर्भ

तीन महिन्यांपासून ‘लालपरी’चे शिलेदार वेतनाच्या प्रतीक्षेत, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण

सुधीर भारती

अमरावती : प्रवाशांच्या सुखदुःखात सहभागी होणारी, खेडी, दुर्गम गावांना एकमेकांशी जोडणारी लालपरी म्हणजेच एसटीच्या शिलेदारांना सध्या "बुरे दिन' आले आहेत. कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजाविणाऱ्या एसटी कामगारांना मागील तीन महिन्यांपासून वेतनासाठी चकरा माराव्या लागत आहेत. शासनाने आता पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक करण्यास परवानगी दिल्याने वाहक व चालकांचे काम आता अधिक वाढले आहे.

कोरोनाच्या काळात विविध अडचणींना सामोरे जात असताना एसटी कामगारांना वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना व लॉकडाउनच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवरसुद्धा पाठविण्यात आले होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून शासनाने एसटी वाहतुकीला हिरवी झेंडी दिल्याने चालक, वाहकांसोबतच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारीसुद्धा कामावर रुजू झालेत. परंतु मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगारच देण्यात आलेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

कुटुंबाचे आरोग्य, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न

कुटुंबाचे आरोग्य, मुलांचे शिक्षण याबाबींवर खर्च कसा करावा, असा प्रश्‍न त्यांना भेडसावत आहे. आता शासनाने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार चालकवाहक, कोरोनाच्या काळातही जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावीत आहेत, मात्र त्यांना आता आपल्या हक्काच्या वेतनाची प्रतीक्षा आहे.

नियमितपणे वेतन मिळावे
एसटीचे कर्मचारी अतिशय धोकादायक परिस्थितीत काम करीत आहेत. त्यांच्यावर कुटुंबाचा भार असतो. अशा स्थितीत नियमितपणे वेतन मिळणे गरजेचे आहे. मात्र तीन महिन्यांचा पगार न दिल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता आहे.
-एस. के. शर्मा, विभागीय कार्याध्यक्ष, एसटी कामगार सेना.

खर्च कोठून भागवावा
वेतन नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुलांचे शिक्षण, कौटुंबिक आरोग्य अशा कारणांसाठी पैशांची गरज असते, मात्र पगारच नसल्याने हा खर्च कोठून भागवावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- शीतल मोहोड, वाहक, निर्भया प्रमुख, अमरावती आगार.

कामगारांना आर्थिक संकटांचा सामना
एसटीचे कर्मचारी अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य बजावीत आहेत. किमान वेळेवर वेतन मिळणे ही रास्त अपेक्षा आहे. मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कामगारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
-जयसिंग चव्हाण, आगार अध्यक्ष, एसटी कामगार संघटना.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ‘नाना’ पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; साश्रू नयनांनी लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप

Dr. Neelam Gorhe : १२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सूचना

FDA Crime : विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृह बंद; ‘एफडीए’ची धडक कारवाई

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान - रामदास आठवले

Nana Patekar : अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT