File photo
File photo 
विदर्भ

समृद्धीसाठी कायद्यानुसारच भूसंपादन

सकाळवृत्तसेवा

समृद्धीसाठी कायद्यानुसारच भूसंपादन
नागपूर : समृद्धी महामार्ग फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्‍ट असल्याने तो पूर्ण करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी शासनाने वाटाघाटीने जागा घेण्यात आली. मात्र, काही शेतकऱ्यांनी जागा देण्यास विरोध दर्शविल्याने आता विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कायद्यानुसार जागा संपादित करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी आज क्रीडासंकुल येथे सुरू असलेल्या आयआरसीच्या अधिवेशनात निवडक पत्रकारांशी बोलताना दिली.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग 700 किमीचा असून यासाठी 93 हजार हेक्‍टर जागेची आवश्‍यक आहे. आतापर्यंत 90 हजार हेक्‍टरच्या जवळपास जागा संपादित करण्यात आली आहे. काही ठिकाणी जागा देण्यास जागा मालकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे ही जागा आता 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार संपादित केली जाईल. रस्त्यांसाठी 16 निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकरच कामाचा शुभारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा रस्ता 90 मीटर रुंद असून यावर ताशी 100 ते 120 किमीने वाहने धावतील. डांबरी रस्ता तयार करण्यावर प्राधान्य देण्यात येणार आहे. रस्त्याच्या बाजूने गॅस पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले.  
367 ठिकाणी अंडर पास
हा रस्ता चार ते पाच ठिकाणी ब्रेक करण्यात आला आहे. येथून वाहन आणि लोकांना दुसऱ्या बाजूला जाता येईल. त्याचप्रमाणे रस्त्याला 267 ठिकाणी अंडर पास देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातून पलीकडच्या शेतात जाण्यास मदत होईल.
नवनगराची निर्मिती
महामार्गावर अनेक ठिकाणी नवनगर निर्माण करण्यात येणार आहे. हे नवनगर चंदीगडच्या धरतीवर तयार करण्यात येणार आहे. या नवनगरचे नियोजन प्राधिकरण एमएसआरडीसीलाच करण्यात आले आहे.
50 हजार कोटींचा खर्च
समृद्धी महामार्गासाठी 33 हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. हा खर्च वर्षभरापूर्वी होती. जागा संपादन करण्यास वर्षभराचा कालावधी लागला. 90 टक्के जागा मिळाल्याशिवाय कामाला सुरुवात करायची नाही, असा पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. आता आवश्‍यक जागा संपादित झाली आहे. साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. या रस्त्यासाठी तीन वर्षे लागतील. या रस्त्यासाठी 50 हजार कोटींचा खर्च येणार असल्याचा अंदाज जोशी यांनी व्यक्त केला. यासाठी एसबीआयने कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. त्रयस्त संस्था म्हणून ते रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT