8f8bba22-d3d6-432f-8f6b-cc640050852e.jpg 
विदर्भ

तान्हुल्या ‘परी’ला घरी सोडून ती कर्तव्यावर!

भगवान वानखेडे

अकोला  ः नवजात बाळाला आई क्षणभरही डोळ्यापासून दूर होऊ देत नाही. तान्हुल्यात तिचा जीव अडकून असतो. मात्र देशावर कोसळेल्या आप्ततीत कुटुंबापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणारी वाहतूक शाखेत काम करणारी एक माता आठ महिन्यांच्या तान्हुलीला सोडून अकोलेकरांचे आरोग्य जपण्यासाठी चौका-चौका कर्तव्य बजावत आहे. वाहूतक पोलिस निता संके यांच्या त्यागाकडे पाहून तरी अकोलेकरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरातच थांबे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

वाहतूक पोलिस तुम्हा-आम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर आपल्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी त्याचे कर्तव्य बाजवत असता. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घरातच रहा, असे आवाहन करून ते तुमचे आरोग्यही जपत आहेत. असे असले तरी रिकामटेकडे रस्त्यावर फिरत असल्याने वाहतूक शाखेची मोठी दमछाक होत आहे. हे कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलिसांचे कुटुंबाकडे होत असलेल्या दुर्लक्षाने त्यांची घालमेल सुरू आहे.अशीच एक महिला वाहतूक पोलिस निता संके आठ महिन्यांच्या मुलीला आजी-आजोबांकडे सोपवून शहरातील रस्त्यावर तिचे कर्तव्य चोखपणे बजावत आहे. या माय-लेकींच्या ताटातुटीचा विचार करून तरी अकोलेकरांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

दर तासाला निर्जंतुकीकरण...
शहर वाहतूक शाखेत सेवा देणाऱ्या महिला पोलिस कॉन्स्टेबल निता संके या शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. घरी सासू-सासऱ्यांकडे आठ महिन्यांच्या परी नावाच्या मुलीला सोपवून त्या रस्त्यावर फिरत आहेत. मुलीला आईच्या दुधाची गरज असल्याने तर एका तासानंतर मुलीला स्तनपान करण्यासाठी त्यांना घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, घरी जातच लगेच मुलीला जवळ घेता येत नाही. आधी स्वतःला निर्जंतुकीकरण करावे लागते आणि नंतरच मुलीला स्तनपान करावे लागते. हा संघर्ष महिनाभरापासून सुरू आहे.

वाहतूक शाखेतील सर्वच कर्मचारी स्वतःला झोकून देत कोरोना विरुद्ध लढाई करीत आहेत. यातच महिला कर्मचाऱ्यांची दुहेरी भूमिका असून, परिवार, मुलांपासून दूर राहून त्या सेवा देत आहेत. तरी आता तरी अकोलेकरांनी घरातच राहून वाहतूक शाखेला सहकार्य करावे.
-गजानन शेळके, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, अकोला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT