girl. 
विदर्भ

हाय रे दैवा! आई देखतच चिमुकलीला बिबट्याने पळविले

प्रमोद काकडे

चंद्रपूर : कोणाचा मृत्यू कुठे दबा धरून बसला असेल आणि तो कसा येईल काहीच सांगता येत नाही. या निष्पाप बालिकेचा मृत्यू बिबट्याच्या रुपाने दबा धरून बसला होता आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.

आईसोबत फिरायला गेलेल्या पाच वर्षीय बालिकेला बिबट्याने उचलून नेले. ही घटना चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील पर्यावरण चौकात आज, बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने वीज केंद्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लावण्या उमाशंकर दांडेकर असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला लागूनच ताडोबाचे जंगल आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचे दर्शन होत असते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास लावण्या आपल्या आईसोबत फिरायला निघाली. त्यावेळी झुडुपात दबा धरून असलेल्या बिबट्याने अचानक पर्यावरण चौक परिसरात आईसोबत असलेल्या लावण्याला उचलून पळ काढला. हा प्रकार बघून घाबरलेल्या आईने आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी परिसरात शोध घेतला असता झुडपात चिमुकली लावण्या जखमी अवस्थेत आढळून आली.

सविस्तर वाचा - नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी मुंबईत बदली

त्यानंतर तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. भरदिवसा बिबट्याने चिमुकलीला उचलून नेऊन ठार केल्याने परिसरात चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर वनविभागाने परिसरात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कर्मचारी तैनात केले आहेत. विशेष म्हणजे, याच परिसरात वीज केंद्राची सुरक्षा असलेल्या जवानांना निवासी गाळे देण्यात आले आहेत. भविष्यात वन्यप्राण्यांचे हल्ले होऊ नये म्हणून वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज ठाकरेंचा 'फर्स्ट क्लास' प्रवास! लोकलमध्ये गर्दीच्या वेळेतही मिळाली विंडो सीट, मनसेच्या ७ जणांना बसायलाही जागा

MNS- MVA Morcha: मग लोकसभेत ३१ खासदारांनी मतचोरी केली होती का? मविआ-ठाकरेंच्या मोर्चावर भाजपचा सवाल

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कामांवर 'डिजिटल' नजर! नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने विकसित केली ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली

मोठी बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २,५४० कोटींची मदत; रब्बी हंगामासाठी १,७६५ कोटींचे पॅकेज जाहीर

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची समझोता बैठक मुंबईत सुरु

SCROLL FOR NEXT