leopard leopard
विदर्भ

सकाळी आजोबाचा मृत्यू अन् रात्री नातवाला बिबट्याने नेले उचलून

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर : दुर्गापूरमधील समतानगर परिसरात बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास बिबट्याने आठ वर्षीय मुलाला उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतीक शेषराव बावणे (वय ८) असे मुलाचे नाव आहे. आतापर्यंत तीन ते चार मुलांवर बिबट्याने हल्ला केला आहे. मागे एका नरभक्ष बिबट्याला जेरबंद केले होते.

बावणे कुटुंबीय बेलोरा तालुका भद्रावती येथील रहिवासी आहेत. मुलाच्या आईच्या वडिलांचा बुधवारी सकाळीच मृत्यू झाला. त्यामुळे सर्व कुटुंब तेजराम मेश्राम यांचा मृत्यू झाल्याने दुर्गापूर येथे आले होते. मेश्राम यांचे पार्थिव घरीच असल्याने सर्व जण घराच्या समोर बसून होते. तर प्रतीक हा घराच्या मागे खेळत होता.

तितक्यात बिबट्याने मुलाला फरफटत जंगलात नेले. प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. मात्र, बालकाचे बिबट्याने लचके तोडले होते. बालकांचे वेगवेगळ्या ठिकाणी अवयव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT