बोंडगावदेवी : घरात ठाण मांडून बसलेला बिबट्या. 
विदर्भ

काय सांगता! एका घरात बिबट्याचा तीन तास मुक्काम...नागरिकांमध्ये धास्ती

विनायक राखडे

बोंडगावदेवी (जि. गोंदिया) : येथून तीन किलोमीटर अंतरावरील खांबी पिंपळगाव येथील यशवंत रामटेके यांच्या घरात बिबट्या शिरला. बुधवारी (ता. २) पहाटे चारच्या सुमारास शिरलेल्या बिबट्याला सकाळी सातपर्यंत जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. दरम्यान, बिबट्याच्या गावातील वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांजराचा पाठलाग

मांजराचा पाठलाग करीत असताना बिबट्या यशवंत रामटेके यांच्या घरात शिरला. यशवंत रामटेके यांची पत्नी आजारामुळे झोपेत होत्या. बिबट्याने मांजराचा पाठलाग करताना त्यांच्या खाटेवरून उडी घेतली. त्यामुळे त्यांना जाग आली. इकडे-तिकडे पाहताच त्यांना बाजूलाच बिबट्या दिसला. त्यामुळे त्या घाबरत मधल्या घरातून बाहेर आल्या व दरवाजा बंद केला.


बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव वनविभागाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाची चमू तत्काळ घटनास्थळी पोहोचली. गोंदिया येथील चमूलाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, पहाटे चार वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू झाली. अखेर सातच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. जेरबंद झालेला बिबट्या एक वर्ष वयोगटातील असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नवेगावबांध वनविभागाच्या स्वाधिन

बिबट्याला जेरबंद करण्याची कार्यवाही अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी दुर्गे, वेलतुरे, कुंभरे, चव्हाण, बुरडे, शेंद्रे, सोनटक्‍के यांनी केली. सरपंच प्रकाश शिवणकर, उपसरपंच देवानंद रामटेके, पोलिस पाटील नेमीचंद मेश्राम व गावकऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी सहकार्य केले. बिबट्याला नवेगावबांध वनविभागाच्या स्वाधिन करण्यात आले आहे.


शेळ्या, कोंबड्या केल्या फस्त

गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन-तीन दिवसांत बिबट्याने शेळ्या, कोंबड्या फस्त केल्या आहेत. यात पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. नंदकिशोर रामटेके यांच्या घरची शेळीसुद्धा बिबट्याने फस्त केली. तथापि, वनविभागाने बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : अमरावतीमधील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण, तरीही लोकार्पण रखडले

Solapur: आषाढीसाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’; स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुविधांवर भर

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

SCROLL FOR NEXT