विदर्भ

रस्त्यावरील खड्ड्याने घेतला रुग्णाचा जीव

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : हृदयविकाराचा झटका आल्यामुळे एका युवकाला तातडीने ऍम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यात ऍम्ब्युलन्स फसली. फसलेली ऍम्ब्युलन्स काढण्यासाठी तब्बल अर्धा तास वेळ गेल्यामुळे रुग्णाचा वेळेवर उपचाराअभावी मृत्यू झाला. भूषण टोळे (बेसा-बेलतरोडी) असे मृत पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्‍त केला आहे.
बेस्यातील एका नामांकित नगरीतील फ्लॅट स्कीममध्ये राहणाऱ्या भूषण टोळे यांना एक सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. पाऊस सुरू होता. कुटुंबीयांनी ऍम्ब्युलन्स बोलावली. तातडीने भूषण यांना रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये ऍम्ब्युलन्स फसली. चालक आणि कुटुंबीयांनी खड्ड्यात फसलेली ऍम्ब्युलन्स काढण्याचा प्रयत्न केला. अपयश आल्यामुळे महिलेने आजूबाजूच्या घराकडे धाव घेऊन आरडाओरड करून नागरिकांना गोळा केले. नागरिकांनी मोठ्या मेहनतीने ऍम्ब्युलन्स खड्ड्यातून बाहेर काढली. ऍम्ब्युलन्स फसल्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णाला जवळपास दोन तास उपचारावाचून तडफडत राहावे लागले. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे भूषण यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनावर दोषारोप केले असून, भूषण यांचा बळी नसून तो सुस्त प्रशासनाने केलेला खून असल्याची संतप्त भावना नागरिकांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT