file photo
file photo 
विदर्भ

बबिताच्या यकृतदानातून युवकाला जीवनदान

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नाव बबिता डोंगरे. वय पन्नाशीचे. दोन्ही किडनी निकामी झाल्या. किडनीच्या प्रतीक्षेत तिचे आयुष्य होते. दानात किडनी मिळेल, अशी आशा होती. परंतु, नियतीला हे मान्य नव्हते. किडनी मिळण्यापूर्वीच उपचारादरम्यान मेंदूमृत झाल्याचे निदान झाले आणि आयुष्याच्या खेळात हरलेल्या बबिताने युवकाला यकृताचे दान करून त्याला नवजीवन दिले. अवयवदानाचा निर्णय घेऊन डोंगरे कुटुंबीयांनी समाजासमोर आदर्शच निर्माण केला.
उप्पलवाडी येथील रहिवासी बबिताचे पती सुरेंद्र डोंगरे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यवस्थापक आहेत. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. बबिता यांना अनेक दिवसांपासून किडनीचा त्रास होता. डॉक्‍टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिल्यानंतर बबिता विभागीय अवयवदान समितीकडे नाव नोंदणी करणार होत्या. अर्जही आणला होता. परंतु तो समितीकडे नोंदणीसाठी सादर केला नाही. आवश्‍यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असतानाच प्रकृती अचानक खालावली. उपचारासाठी श्रीकृष्ण हृदयालयात दाखल केले. उपचार सुरू झाले. डॉक्‍टरांनी डायलिसिसवर ठेवले. परंतु, शनिवारी उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यांना तत्काळ लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. विविध तपासण्यांअंती मेंदूमृत असल्याचे निदान झाले. याबाबत अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे आणि समन्वयक वीणा वाठोडे यांना कळविण्यात आले. बबिताच्या अवयवदानासंदर्भात पती सुरेंद्र आणि भाऊ विनोद मेश्राम यांचे समुपदेशन केले. अवयवदानास होकार दिल्यानंतर लगेच यकृताच्या प्रतीक्षेतील 25 वर्षीय युवकाच्या शरीरात यकृत प्रत्यारोपित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT