lightning on Mausoleum place of Ex CM vasant rao naik in Yavatmal  
विदर्भ

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गहुली येथील समाधी स्थळावर कोसळली वीज 

दिनकर गुल्हाने

पुसद, (जि. यवतमाळ) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब नाईक यांच्या गहुली येथील समाधीस्थळावर गुरुवारच्या मध्यरात्रीनंतर अचानक वीज कोसळली.या दुर्घटनेत समाधी स्थळाच्या घुमटाचे मोठे नुकसान झाले.शुक्रवारी सकाळी ही माहिती मिळताच आमदार निलय नाईक यांनी समाधी स्थळाला भेट दिली.

गुरुवारी रात्री गहुली शिवारात रिमझिम पाऊस सुरू होता. मध्यरात्रीनंतर अचानक विजेचा लोळ वसंतराव नाईक व त्यांचे मोठे बंधू राजूसिंग उर्फ बाबासाहेब नाईक यांच्या समाधीस्थळावर कोसळला. त्यामुळे समाधीस्थळाचे घुमट क्षतिग्रस्त झाले. घुमटाला तडा गेला. वसंतराव नाईक पुतळ्या मागील कलाकुसर केलेली कमान कोसळली.मात्र, वसंतराव नाईक व बाबासाहेब नाईक त्यांचे अर्धपुतळे शाबूत राहिले. 

सकाळी ही माहिती मिळताच गहुली येथील रुपेश जाधव यांनी माजी मंत्री मनोहर नाईक तसेच आमदार निलय नाईक यांना कळविली.निलय नाईक गहुलीत असल्याने त्यांनी लगेच समाधी स्थळाला भेट दिली.

पुसद येथील तहसीलदार अशोक गीते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश झळके यांनी घटनास्थळी भेट देऊन क्षतिग्रस्त भागाची पाहणी केली.यावेळी उपसरपंच विलास आडे व गहुलीतील नागरिक उपस्थित होते.

समाधीस्थळावर वीज कोसळल्याने घुमटाचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचा आराखडा तयार करून पुनर्निर्माण करण्यात येईल, अशी माहिती उपअभियंता प्रकाश झळके यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.तहसीलदार गीते यांनी  विज कोसळल्याच्या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळविली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moscow Drone Attack : रशियाची राजधानी हादरली! मॉस्कोवर युक्रेनच्या १००० ड्रोनचा हल्ला, ऑइल रिफायनरीलाही फटका, दोन ठार

Latur DCC Bank : संचालकपदावरून सहकारमंत्रीच बडतर्फ, कारवाई अयोग्य असल्याचा मंत्र्यांचा दावा; RBI विरोधात हायकोर्टात जाणार

Vastu Tips for Kitchen: फ्रिजच्या वर ‘या’ ४ वस्तू ठेवताय? आजच हटवा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT