milk can. 
विदर्भ

दारू प्रेमींची नवी शक्कल, दुधाच्या कँनमधून पोहोचतेय दारू

सकाळ वृत्तसेवा

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : लॉकङाऊनमध्ये जिल्ह्याच्या सीमाबंद केल्या आहेत. दुसऱ्या राज्यातील आणि जिल्ह्यातील माणसांना प्रवेशबंदी आहे.  दारूसाठी मात्र मोकळे रान आहे. यवतमाळ जिल्ह्यातून घुग्घुसमार्गे मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात दारू येत आहे.
लॉकडाऊनमध्ये जीवनावश्‍यक वस्तू आणण्याची परवानगी मिळाली आहे. त्यांच्यासाठी जिल्हाबंदीची अट शिथील आहे. याचाच फायदा दारूतस्कर घेत आहेत. जीवनावश्‍यक वस्तू आणण्यासाठी वाहनांना "पास" दिले आहेत. या जिल्ह्यात येणाऱ्या दुधाच्या कॅनमधून दारू आणली जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तो जिल्हा रेडझोनमध्ये आहे. चंद्रपूर "ग्रीन झोन'मध्ये येतो. या जिल्ह्यात दारूबंदी आहे. यवतमाळात लॉकडाऊनमुळे दारूच्या दुकानांना टाळे लागले आहे. त्याउपरही रात्रीच्या सुमाराला दुकान उघडून जिल्ह्यात दारू पाठविली जात आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची वाहने रात्रीच शहरात दाखल होतात. यवतमाळच्या सीमेजवळ बेलोरा पूल, सिरपूर आणि घुग्घुस येथे पोलिस चौकी आहे. एकदिवसा आड दोन्ही जिल्ह्यांचे पोलिस आपापल्या चौकीत तैनात असतात. या दरम्यान तस्करांसाठी अनुकूल पोलिस अधिकारी तैनात झाले की दारू पोचती केली जाते, अशी माहिती आहे. जिल्ह्याची सीमा ओलांडून आलेल्या माणसांना पकडून पोलिस कारवाई करतात. त्याचे विलगीकरण करतात. मात्र, माणसांना जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना दारू मात्र खुलेआम पोहोचत आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या दारूतस्करीचे या जिल्ह्यातही कोरानाचे संक्रमण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा - अशी वेळ कोणावरही येऊ नये...कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करणा-या कर्मचा-याच्या भावना
तिप्पट किंमतीत विक्री
चंद्रपूर जिल्ह्यात पाच वर्षांपासून दारूबंदी आहे. लगतच्या जिल्ह्यातील दारू या जिल्ह्यात आतापर्यंत दुप्पट किमतीने विकली जायची. आता यवतमाळ आणि दारू सुरू असलेल्या लगतच्या जिल्ह्यातील दारू दुकान लॉकडाऊनमुळे बंद आहे. दारूचा तुटवडा आहे. मात्र, तरीही मोठ्याप्रमाणात दारू येत आहे. ती तिप्पट किंमतीने विकली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT