tur dal akola.jpg 
विदर्भ

गुड न्युज...किलोभर डाळीचे दोन घास जाणार गरिबांच्या तोंडात

सुगत खाडे

अकोला : टाळेबंदीच्या काळात मोदी सरकारने रास्तभाव दुकानांमधून गरिबांना मोफत तांदुळाचे वाटप केले. त्यानंतर आता गरिबांना मोफत डाळींचे सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. मोदी सरकारची ही डाळ या आठवड्यात प्रत्येक घरात पोहचेल व त्यानंतर घरा-घरात शिजेलही. कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी प्रत्येक नागरिक घरात राहावा यासाठीच तीन महिने या मोफत डाळींचे वाटप करण्यात येणार आहे. 

कोरोना विषाणूने जगभरात आपलं जाळं पसरवलं आहे. जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत 17 मेपर्यंत टाळेबंदी (लॉकडाउन) जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. टाळेबंदीच्या या काळात केंद्र व राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे. त्यानंतर आता शासनाने अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारकांना (प्रती कार्ड) एक किलो मोफत डाळीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेशन दुकानांमधून आता तूरडाळ किंवा हरभरा डाळीचे वाटप करण्यात येईल. एप्रिल, मे व जून महिन्यांसाठी सदर डाळीचे वाटप करण्यात येईल. जिल्ह्यातील दोन लाख 64 हजार 492 लाभार्थ्यांना सदर निर्णयाचा लाभ मिळेल. ताळेबंदीत घरातच असलेल्या लाखो नागरिकांना मोफत डाळ मिळणार असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. 

तीन हजार क्विंटलची मागणी
अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना मोफत डाळ देण्यासाठी तीन हजार क्विंटल डाळीची मागणी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे केली आहे. सदर मागणी एक महिन्यासाठी आहे. पुरवठा विभागाच्या अमरावती येथील विभागीय गोदामातून सदर डाळ जिल्ह्यात पोहचेल. हरभरा किंवा तूरडाळ लाभार्थ्यांला देण्यात येईल. 

असे आहेत जिल्ह्यातील कार्डधारक

  • अंत्योदय कार्डधारक - 43 हजार 707 
  • प्राधान्य कार्डधारक - 2 लाख 20 हजार 785 

या आठवड्यात सुरु होईल वाटप
जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारकांना प्रत्येकी एक किलो मोफत तूर किंवा हरभरा डाळींचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन हजार क्विंटल डाळीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

Sikkim Tourism: सिक्कीममधील गुरुडोंगमार सरोवर पुन्हा खुले, पण नियम मोडल्यास प्रवास रद्द!

Satara News: साताऱ्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची परवड; गॅसटंचाईमुळे खाणावळी बंद, विद्यार्थी गावी परतल्याने अभ्यासिका ओस

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT