मोहम्मद आरिफ  
विदर्भ

मालिक का रहम और किस्मत का ताला!

नितीन नायगांवकर

मालिक का रहम और किस्मत का ताला!
नागपूर : दुसऱ्याच्या हाताखाली काम करून जेमतेम पगारावर मालकाचे बोलणे खाण्यात त्याला रस नव्हता. एक दिवस त्याने नोकरीला लाथ मारली आणि स्वतःच्या भरवशावर रोजगार उभा करण्याचा निर्णय घेतला. "किस्मत का ताला कैसे खुलेगा ये मालूम नही था. पर मुझ पे मालिक का रहम था', असे सांगणारे मोहम्मद आरिफ तीस वर्षांपासून फक्त डुप्लिकेट चावीच्या व्यवसायाच्या जोरावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतोय.
मोहम्मद आरिफ या माणसाला नावाने कुणी एखादवेळेला ओळखत नसेल, पण गेली कित्येक वर्षे आपल्या कामात मग्न असलेली ही मूर्ती मेडिकल चौकात नक्कीच बघितली असेल. गाडीची चावी हरवली, घराच्या कुलपाच्या डुप्लिकेट चावी करायच्या आहेत किंवा फक्त कुलूप दाखवून दुसरी चावी तयार करून घ्यायची आहे तर या व्यक्तीची अनेकांना गरज पडली असेल. भालदारपुऱ्यातील मोहम्मद अली चौकात राहणारा मोहम्मद आरिफ गेली तीस वर्षे या व्यवसायात असून त्यातील 22 वर्षे मेडिकल चौकात पेट्रोल पंपाच्या पुढे फुटपाथवर त्यांचे दुकान आहे. एका स्टॅण्डवर जुन्या पुराण्या चाव्यांचे बंडल ठेवलेले आणि त्यापुढे चाव्यांची घसाई करताना बसलेली ही व्यक्ती खरे तर मेडिकल चौकातील अनेक स्थित्यंतराची जिवंत साक्षीदारच. उमेदीच्या काळात एका दुकानात त्यांनी नोकरी केली. "मेहनत आणि चांगले काम करूनही मालक शिव्या द्यायचा. घालून-पाडून बोलायचा. एक दिवस नोकरी सोडली आणि मित्राच्या दुकानात बसलो असताना या व्यवसायाची कल्पना सुचली,' असे मोहम्मद आरिफ सांगतात. आरिफ यांचे वडील सायकल रिक्षा चालवायचे. वडील, तीन भाऊ आणि आई असा परिवार. अशात फक्त बसल्या जागी या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले आणि दुसऱ्या दिवशी दुकान टाकले. हा एक साधा व्यवसाय नसून कौशल्य आहे. त्यामुळेच दिवसाला सरासरी पाचशे रुपये रोजी कमावणारे आरिफसारखे फार मोजके लोक समाजात आहेत. आज आरिफ यांचा मुलगा सतरा वर्षांचा असून तो नाईट स्कूलमध्ये आणि पंधरा वर्षांची मुलगी उर्दू शाळेत शिक्षण घेत आहेत. भाग्य का ताला खुला हो... तो सब ताले स्वयं ही खुल जाते है... असं म्हणतात ते उगाच नव्हे.

ताला देख के चावी बना लेता हूँ. वैसे चेहरा देख के आदमी भी पहचान लेता हूँ. इसलिये आज तक गलत काम के लिये कोई चावी नही बनायी.
- मोहम्मद आरिफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT