printing press 
विदर्भ

लॉकडाउन मुळे ‘प्रिंटिंग प्रेस’ची चाके थांबली

मनोज भिवगडे

अकोला : बेरोजगारीवर मात करीत स्वतःचा व्यवसाय थाटण्यासाठी लाखोंचे कर्ज घेवून प्रिंटिंगच्या व्यवसात उतरलेल्या तरूणांवर लॉकडाउनने पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रिंटिंग प्रेसची चाके थांबल्याने मुद्रक अडचणीत आले आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर अवलंबून असणारे कारागीर ऑपरेटर, मजूर व कामगारांचाही रोजगार हिरावला आहे.


कोव्हिड-19 विषाणू अर्थात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत राज्य आणि संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यातच हातावर पोट असणाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. यात प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांच्या मशिनची चाके थांबल्याने मुद्रण व्यावसायिक अडचणीत आले आहे. ऑफसेट प्रिंटिंग, बाइंडिंग, स्क्रीन प्रिंटींग, कटिंगच्या मशनरी वर काम करणाऱ्या हातांना व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांसह इतर कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. गंभीर परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, घर भाडे, दुकान भाडे कसे भरावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. याबाबत घर मालकाने व दुकान मालकांनी 3 महिन्याचे भाडे कमी करावे व शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील व्यावसायिकांनी शासनाकडे अकोला जिल्हा मुद्रक संघातर्फे करण्यात येत आहे.

लग्नसराईचा व्यवसाय ही गेला
वर्षभरात जानेवारी ते जूनपर्यंत लहान-मोठी विवाह मुहूर्त असतात. त्याबरोबर छोटे-मोठे कार्यक्रम, उद्‍घाटन सोहळे, माहिती पत्रके, शैक्षणिक छपाईची कामे असतात. मार्च ते मे या तीन महिन्यांत लग्नसराई मोठ्या प्रमाणात असल्याने सुमारे एक, दोन महिन्या अगोदर विवाह पत्रिका छापली जाते; मात्र मार्च महिन्यापासून देश लॉकडाउन करण्यात आल्याने व्यवसायिक व कारागीर हतबल झाले आहेत.

हाती असलेले कामही करता येईना!
लॉकडाउनच्या आधी छपाईसाठी घेतलेली कामे लॉकडाउन घोषित झाल्याने रखडली आहेत. कोरोनामुळे प्रिंटिंग प्रेस बंद आहेत. कृषी केंद्र व इतर शासकीय निम शासकीय यंत्रणांकडील घेतली कामे लॉकडाउनमुळे अपूर्ण आहेत. लॉकडाउन नंतर परिस्थिती सावरण्यासाठी किती कालावधी लागेल हे सांगणे कठीण आहे.

शासनाने करावी आर्थिक मदत
अकोला जिल्हा मुद्रक संघाच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, सल्लागार मंडळ तसेच कार्यकारी सदस्यांनी या अडचणीच्या काळात शासनाच्या कामात कोणताही अडथळा निर्माण न होता अडचणीतील मुद्रक व्यवययिकांना मदत करण्याची मागणी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याची घौडदौड सुरूच! भावात सलग पाचव्या दिवशी वाढ, चांदीही महागली; तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा भाव? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या ३० उमदेवारांची यादी काँग्रेसकडून आज प्रसिद्ध होण्याची शक्यता

Gujarat Earthquake Today : पहाटे गुजरात हादरलं; कच्छ भागात भूकंपाचे धक्के, भूकंपशास्त्र विभागाची माहिती

कोणाचा काडीमोड, तर कोणाचं लग्न तुटलं, 2025 मध्ये 'या' सेलिब्रेटींच्या नात्याता आली मोठी दरी

Prakash Ambedkar: हिंदू मतदारांनी काँग्रेस पक्षाला सोडलंय: ॲड. प्रकाश आंबेडकर, भाजप सोडून युती करण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT