File photo 
विदर्भ

लोधी समाज इतर मागासवर्गीय सूचीत येणार

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : महाराष्ट्रात मोठ्या संख्येत असलेल्या लोधी, लोधा आणि लोध या जातींचा समावेश राज्यात इतर मागासवर्गीयांच्या सूचीत केला आहे. परंतु, केंद्र शासनाच्या इतर मागासवर्गीय सूचीत समावेश नसल्याने या जाती बांधवांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. या जातींचा केंद्राच्या इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्याची मागणीसाठी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. दरम्यान, आरक्षण सूचीत बदल करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या सचिवांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेला विषय मार्गी लागण्याची आशा बाळावली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर खासदार सुनील मेंढे यांच्याशी संपर्क साधून लोधी, लोधा, लोध समाजबांधवांनी त्यांची अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेली मागणी मार्गी लावण्याची विनंती केली होती. महाराष्ट्राच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हे समाजबांधव वास्तव्यास आहेत. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर या समाजाचा आर्थिक व सामाजिक स्थितीचा अभ्यास करुन त्यांना 2004 मध्ये राज्याच्या इतर मागासवर्गीयांच्या सूचीत समाविष्ट केले होते. मात्र, केंद्राच्या सूचीत अजूनपर्यंत या जातींचा समावेश झालेला नाही.
लोधी समाज देशातील 18 राज्यात वास्तव्य आहे. यापैकी 14 राज्यात लोधी समाज केंद्र आणि राज्याच्या मागास सूचीत आहे. 2 राज्यात अनुसूचित जमातीमध्ये आहे. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांत हा इतर मागासवर्गीयांच्या यादीत आहे. परंतु केंद्राच्या सूचीत नाही. हा विषय लक्षात घेऊन खासदार मेंढे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

Naigaon Crime : बापाचा मृतदेह दारातच सोडून नराधम मुलगा पळाला; मात्र, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT