Rangubeli Village Boycott of Elections sakal
विदर्भ

Boycott of Elections : रंगुबेली गटग्रामपंचायतचा निवडणुकीवर बहिष्कार; सहा गावांचा समावेश

देशाला स्वातंत्र्य होऊन ७७ वर्षे झालीत. मात्र अद्यापही आम्ही मूलभूत सुविधांपासून वंचित आहोत. निवडून दिलेला एकही प्रतिनिधी आमच्या समस्यांचे निराकरण करण्यास तत्पर दिसत नाही.

सकाळ वृत्तसेवा

धारणी - मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम गटग्रामपंचायत रंगुबेलीमध्ये येणारी रंगुबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा आणि खोपमार या सर्व गावांतील नागरिकांनी यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा या चारही निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

देशाला स्वातंत्र्य होऊन ७७ वर्षे झालीत. मात्र अद्यापही आम्ही मूलभूत सुविधांपासून वंचित आहोत. निवडून दिलेला एकही प्रतिनिधी आमच्या समस्यांचे निराकरण करण्यास तत्पर दिसत नाही, अशी खंत या सर्व गावांतील नागरिकांनी व्यक्त केली. याच बरोबर या निवडणुकीत प्रचार व प्रसारासाठी येणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला गावात येण्यास मनाई केली आहे.

जोपर्यंत या गावात पिण्याचे पाणी, विद्युत सुविधा, पक्के रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा आदी मूलभूत सुविधा आजपर्यंत पुरविण्यात आल्या नाहीत. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. आमच्या समस्या मात्र समस्याच राहिल्या म्हणून अनेक बैठका घेतल्यानंतर आम्ही सर्व गावकरी एक मत करून हा निर्णय घेतला आहे.

जोपर्यंत आमच्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही. यासाठी या गावातील नागरिकांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे माहिती देऊन विनंती केली आहे. वरील मागण्या पूर्ण होईपर्यंत कुठल्याही निवडणुकीसाठी लागणारे पोलिंग बूथ तसेच पोलिंग साहित्य, प्रशासनिक अधिकारी पाठवू नये. आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

त्याकरिता कुठलेच निवडणुकीसाठी यंत्रणा पाठवून विनाकारण खर्च करू नये, असे आवाहन गावकऱ्यांनी निवेदनात केले होते. पाचही गावात आज सकाळपासून निवडणुकीसाठी यंत्रणा दाखल झाली. मात्र गावातील नागरिकांनी निवडणुकीत बहिष्कार टाकल्यामुळे १० वाजेपर्यंत शून्य मतदान झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev Kangana Ranaut : बाबा रामदेव यांचा कंगना रणौतवर पलटवार; म्हणाले, ‘अशा लोकांबद्दल टिप्पणी करायची नाही’

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

Sugar Rate : दिवाळीपर्यंत साखर शंभरी पार जाण्याची भीती; राज्यात १८ लाख टन साठा शिल्लक

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

माझी इच्छा नव्हती सुनीधीकडून गाऊन घ्यायची... अवधूत गुप्तेने सांगितली 'कांदे पोहे' गाण्याची कथा; मराठी अभिनेत्रीने आधीच गायलेलं गाणं

SCROLL FOR NEXT