Arjun Rodage sakal
विदर्भ

Lonar Crime : साथीदाराच्या मदतीने प्रियकराला संपवले; सरोवर परिसरातील जंगलात सापडला मृतदेह, दोन आरोपींना अटक

घनदाट जंगलात एका २८ वर्षीय युवकाचा गळा दाबून खून करून नंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

लोणार - सरोवरातील यज्ञेश्वर मंदिराजवळील दर्गा रोड बाजूच्या घनदाट जंगलात एका २८ वर्षीय युवकाचा गळा दाबून खून करून नंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला. मृत युवकाचे नाव अर्जुन दिलीप रोडगे (वय २८) असून तो परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यातील रवळगाव येथील रहिवासी आहे.

ही घटना काल सोमवारी (५ ऑगस्ट) रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे लोणार शहरात एकच खळबळ उडाली होती. अनैतिक संबंधातून महिलेने साथीदाराच्या मदतीने हा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अर्जुन रोडगे हा २ ऑगस्टपासून घरून निघून गेल्याची तक्रार त्याचे वडील दिलीप बाबाराव रोडगे यांनी शेलू पोलिस स्टेशनला केली होती. पोलिस तपासात मृतक अर्जुनचे गावातीलच एका २९ वर्षीय विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे शेलू पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच ती बोलू लागली. तिने साथीदाराच्या मदतीने अर्जुनचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. सदर खून लोणार सरोवर परिसरात करून मृतदेह घनदाट जंगलातील जाळीत फेकून दिल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.

या माहितीच्या आधारे शेलू पोलिसांचे पथक ५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता आरोपी महिलेला घेऊन लोणारनजीकच्या जंगलात दाखल झाले. तिने मृतक अर्जुनचा खून कुठे केला व त्याचा मृतदेह कुठे फेकला, हे स्थळ पोलिसांना दाखविले. अर्जुनचा खून करण्यासाठी तिला मदत करणारा तिचा साथीदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आहेलाजी डुकरे (२४, रा. खडुळा, ता. पाथरी, जि. परभणी) यालाही पोलिसांनी अटक केली.

असा झाला अर्जुनचा घात

मृत अर्जुन व महिला आरोपी यांनी लोणार सरोवर फिरायला जाण्याचा बेत आखला. २ ऑगस्ट रोजी ते स्कुटीने लोणार सरोवर परिसरात आले. सरोवराच्या गेटवर त्यांनी रीतसर नोंदणी केली. त्यानंतर आतमध्ये दर्गा रोडने जाणाऱ्या पाऊलवाटेने जाऊन एका झाडाखाली बसले. तेथेच लपून असलेल्या आरोपीच्या मित्राने अर्जुनवर हल्ला केला व गळा दाबून त्याचा खून केला. यानंतर मृतदेह ओढत नेऊन जंगलातील झाडीत फेकून दिला. तेथून आरोपी महिला स्कुटीने परत निघाली व स्कुटी ढोकसळ गावाच्या समोर सोडून तिथून गावी परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT