file photo 
विदर्भ

राइसमिल मालकांकडून का होतेय शेतकऱ्यांची लूट...काय आहे कारण

विश्‍वपाल हजारे

लाखांदूर (जि. भंडारा) : उन्हाळी धानाची आधारभूत खरेदी केंद्रांत विक्रीची मुदत दोन दिवसांत संपत आहे. दरम्यान, केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना सरळ उचल आदेश देऊन खरेदी सुरू ठेवली आहे. मात्र, राइसमिल मालक धान खरेदी करताना ओलाव्याच्या नावावर प्रतिक्विंटल सहा ते सात किलो धान अधिक घेऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. याकडे केंद्राच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

यंदा उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले. खरिपातील खरेदीमुळे तालुक्‍यातील बहुतेक गोदाम भरले आहेत. आता उन्हाळी धानाच्या खरेदीसाठी आधारभूत केंद्र उशिरा सुरू करण्यात आले.

खरेदी केंद्रात गोंधळात गोंधळ

धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, याचवेळी गोदामातील मालाची उचल करण्याचे आदेश राइस मिलर्सला दिले आहेत. आता केंद्रात खरेदी व धानाची उचल अशी दोन्ही कामे एकाचवेळी सुरू आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रात गोंधळ निर्माण होण्याची परिस्थिती आहे.

प्रतिक्विंटल सहा ते सात किलो धान

शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाची विहित मुदतीत मोजणी होणे शक्‍य नाही. त्यामुळे काही केंद्रांत विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांच्या मालाची थेट उचल केली जाते. यात धर्मकाट्यावर मोजमाप करून राइसमिलमध्ये धान पाठविले जाते. त्यानुसार धानाची खरेदी करताना धानात ओलावा असल्याचे सांगून प्रतिक्विंटल सहा ते सात किलो अधिकचे धान मोजले जाते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. या गैरप्रकाराला शेतकऱ्यांनी विरोध केल्यास त्याला केंद्रातून धान परत घेऊन जाण्याची धमकी दिली जाते.

महिना लोटूनही ओलावा कायम

उन्हाळी हंगामातील धान कापणी व मळणी पूर्ण होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे आताही धानाचा ओलावा कापणे योग्य नाही. हे शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठी अधिक धान घेण्याचे षड्‌यंत्र आहे, असा आरोप होत आहे. दरम्यान, केवळ दोन दिवसांची मुदत असताना केंद्र चालकांकडून दिल्या जाणाऱ्या धान उचल आदेशानुसार राइसमिल मालकाकडून अधिकचे धान घेतले जात असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Killing Case : जयसिंगपुरात भरदिवसा तरुणाचा खून; मित्रानेच केला ‘गेम’, शहरात खळबळ

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात अंबाजोगाईतील भावंडांची सीबीआयकडून गुप्त चौकशी; लातूरमधील मोठ्या रॅकेटचे धागेदोरे

Appa Mahadik Anandrao Patil : महादेवराव महाडिकांनी आनंदराव पाटलांचा अपमान केला होता का?; महाडिक गटाकडून खुलासा; गोकुळवरून राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यात आंदोलन

सुरुवातीला जाणवलं नाही, नंतर... एक-दोनदा नाही तर निवेदिता सराफ यांना तब्बल तीनदा झालेला करोना; म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT