Loss of 5 lacs due to fire in red gram crops  
विदर्भ

आगीत तुरीची गंजी, गोठा जळून खाक; शेतकऱ्यांचे साडेपाच लाखांचे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

आष्टी (जि. वर्धा) : आष्टी तालुक्‍यातील खंबित येथील सुधाकर कोहळे यांच्या गुरांच्या गोठ्याला अनोळखी व्यक्‍तीने आग लावली. यात जनावरांचा गोठा जळून खाक झाला. तर उमेश कोकाटे यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला आग लावल्याने संपूर्ण तुरीची गंजी स्वाहा झाली. या दोन्ही घटना बुधवारी (ता. 13) मध्यरात्रीदरम्यान घडल्या.

खंबित येथील शेतकरी सुधाकर कोहळे यांचा गावाशेजारी जनावरांचा गोठा आहे. गोठ्यात शेतातील पेरणीचे साहित्य, स्प्रिंकलर, पाइप, जनावरांचा चारा, इतर साहित्य असा पाच लाखांचा मुद्देमाल जळून स्वाहा झाला. 

शेतकरी सुधाकर कोहळे यांनी दोन बैल व म्हैस मोकळ्या जागेत बांधल्याने गुरे बचावली. पहाटेच्या सुमारास गावाशेजारी आगीचे लोळ व धूर दिसत असल्याचे पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत गोठा जळून खाक झाला होता.

अर्ध्या किलोमीटर अंतरावर उमेश कोकाटे यांच्या शेतातून आगीचे लोळ बाहेर पडत असताना ग्रामस्थांना दिसले. तेव्हा दोन एकरांतील तुरीच्या पेट्या असलेली गंजी आगीच्या भक्षस्थानी सापडून स्वाहा झाली होती. एकाच दिवशी दोन घटना घडल्याने खंबित गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात उमेश कोकाटे यांचे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

'या' ग्लॅमरस मराठी अभिनेत्रींचं दुसरं लग्न चर्चेत; एका अभिनेत्रीची प्रेमकहाणी आहे भन्नाट!

Nagpur Crime: नागपूर हादरलं! चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या... चार आरोपी अटकेत

Pune Tanker Accident : वानवडीत पाण्याच्या टँकरच्या धडकेत 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; डोकं चाकाखाली चिरडलं, चालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

SCROLL FOR NEXT