File photo
File photo 
विदर्भ

सिमेंटीकरणात कवेलू हरविले

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : स्वातंत्र्योत्तर व स्वातंत्र्यपूर्व काळात महत्त्वपूर्ण समजला जाणारा कवेलू व्यवसाय आधुनिकीकरणातील सिमेंटीकरणामुळे डबघाईस आला आहे. जिल्ह्यातील जवळपास 40 केवलू कारखाने गेल्या काही वर्षांत बंद पडले आहेत. उरल्यासुरल्या काही कारखान्यांनाही मागणी नसल्याने कुलूप लागले. कारखाने बंद पडल्याने शेकडो कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.
डोक्‍यावर हक्काचा निवारा म्हणून काही वर्षांपूर्वी कवेलूचाच वापर केला जात होता. मात्र, बांधकाम क्षेत्रात बदल झाले आणि डोक्‍यावर आता सिमेंट कॉंक्रिटचा निवारा आला. केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही आताघरांचे सिमेंटीकरण झाले आहे. परिणामी, कवेलू उद्योगाला याचा मोठा फटका बसला आहे.
घरांच्या छतावरून कवेलू बेपत्ता झाले असले, तरी घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी सिमेंट कॉंक्रिटवर ते आजही लावले जातात. गावखेड्यात अद्यापही मोठ्या संख्येत कवेलू घरे आहेत. मात्र, त्याच्या जागेवरही आता टिनाची पत्रे दिसायला लागली आहेत. परिणामी, दिवसेंदिवस कवेलूची मागणी कमी होत आहे. ती मागणी कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात कवेलू कारखान्यांची संख्या जवळपास चाळीसच्या घरांत होती. साधारणत: प्रत्येक कवेलू कारखान्यात 30 ते 40 कामगार काम करीत होते.
जिल्ह्यात मुख्यत: मॉर्डन, चव्हाण, मामीडवार, महावीर, कोठारी, बागला, कुंभार सोसायटी, दादाभाई पॉटरीज या व्यावसायिकांचे कवेलू कारखाने होते. पण जसजसे बांधकाम क्षेत्रात बदल होत गेले तशी या कारखान्यांनी अखेरची घटका मोजायला सुरुवात केली. या कारखान्यात काम करणाऱ्या कुशल कामगारांना आता रोजगाराचा प्रश्‍न भेडसावत आहे. शेकडो कामगारांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे.
चंद्रपुरात 1952 मध्ये चव्हाण कवेलू कारखान्याची स्थापना करण्यात आली. त्यावेळी कवेलू काढण्याचे काम हाताने करावे लागायचे. तेव्हा प्रतिवर्षी तीन ते चार हजार कवेलू तयार होत होते. कालांतराने कवेलू तयार करणाऱ्या मशीनचा शोध लागला. त्यामुळे प्रतितासात 100 ते 200 कवेलू तयार होऊ लागले. त्या काळात जसजशी कवेलूंची मागणी वाढत गेली तसतशी कवेलूसाठी लागणाऱ्या मातीची किंमत वाढली. मजुरीसुद्धा वाढत गेली. हा काळ या उद्योगासाठी सुगीचा होता. परंतु, आता या क्षेत्रात झपाट्याने बदल झाले आणि कवेलू कारखाने नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT