file photo
file photo 
विदर्भ

प्रेम, गर्भधारणा अन्‌ प्रसूती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रियकराने बलात्कार केला. त्यामधून तिला गर्भधारणा झाली आणि प्रसूत झाली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पोलिसांनी प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षांची मुलगी ही मूळची भागलपूर बिहारची आहे. तिचे आईवडील सध्या नागपुरात राहतात. तिच्या घराजवळ राजा कुमार (20, रा. भागलपूर) हा युवक राहतो. त्याच्या बहिणीशी मुलीची मैत्री होती. राजाने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवले. जानेवारी 2019 मध्ये तिला भागलपूर रेल्वेस्थानकाजवळील लॉजमध्ये नेले व शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तीन महिन्यांपूर्वी हा प्रकार लक्षात आला. सहा महिन्यांची गर्भवती असताना मुलीच्या आईने शेजारी राहणारा राजाशी चर्चा केली. त्याने लग्नास नकार दिला. सहा महिन्यांची गर्भवती असल्यामुळे गर्भपातही होणे शक्‍य नव्हते. त्यामुळे आई मुलीला आपल्या माहेरी नागपुरात घेऊन आली. दोन दिवसांपूर्वी मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे रुग्णालयातील डॉक्‍टरांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करीत आरोपी प्रियकर राजाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायन्नावार यांच्या मार्गदर्शनात हवालदार विजय नेमाडे करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT