file photo 
विदर्भ

प्रियकर निघाला दोन लेकरांचा बाप : नागपुरातील तरुणीची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दुकानातून मोबाईल फायनान्स करणाऱ्या मोबाईल विक्रेत्याने 17 वर्षीय तरुणीवर तिच्या घरात शिरून बलात्कार केला. तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. दीपक चिरकुटराव बारंगे (रा. साईबाबानगर, खरबी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बारंगे याची नंदनवन परिसरात मोबाईल शॉपी आहे. फेब्रुवारी 2019 ला न्यू सहकार नगरात राहणारी तरुणी दीपकच्या मोबाईल शॉपीत गेली. तिने महागडा मोबाईल विकत घेतला. दरम्यान, दर महिन्याला मोबाईलची किस्त भरण्यासाठी जात असताना दीपक आणि तरुणीची मैत्री झाली. दोघांचे वॉट्‌सऍपवरून चॅटिंग आणि भेटीगाठी सुरू झाल्या. दरम्यान, दीपकने तिच्या मोबाईलच्या उर्वरित किस्तही माफ केल्या. दीपकने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला फिरायला नेणे किंवा चित्रपट बघायला जाण्यासाठी आग्रह करीत होता. मे महिन्यात घरी कुणीही नसताना दीपक तिच्या घरी आला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तरुणीने नकार दिला. त्याने लग्न करण्याची तयारी दर्शविली. शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर त्याने आईवडिलांशी भेट घालून देण्याचे आश्‍वासन तिला दिले. परंतु, तो भेट घालून देण्यास टाळाटाळ करीत होता. काही दिवसांपूर्वी दीपकने तिच्या घरी जाऊन लग्न करण्यास असमर्थता दर्शविली आणि निघून गेला. त्याच्या अशा वागण्यामुळे ती गोंधळात पडली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने नंदनवन पोलिस ठाण्यात लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या दीपकचा पोलिस शोध घेत आहेत.
प्रियकर निघाला विवाहित
दीपक बारंगे याने लग्नास अचानक नकार दिल्यामुळे तरुणीने त्याची कौटुंबिक माहिती काढली. दीपक हा विवाहित असून त्याला दोन मुलेसुद्धा आहेत, अशी माहिती तिला मिळाली. परंतु, दीपकने अविवाहित असल्याचे सांगून लग्न करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे तिने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास होकार दिला होता. त्याला धडा शिकविण्यासाठी बलात्काराची तक्रार तरुणीने पोलिसात केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT