murder sakal
विदर्भ

Vidarbha Crime : शेतशिवारात आढळले प्रेमीयुगलाचे मृतदेह, हत्या की..?

विवाहित असतानाही प्रेमसंबंधात असलेल्या प्रेमीयुगलाचे मृतदेह शेतशिवारात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पोंभुर्णा - विवाहित असतानाही प्रेमसंबंधात असलेल्या प्रेमीयुगलाचे मृतदेह शेतशिवारात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार (ता. २७) सायंकाळी सात वाजताच्या सात सुमारात उघडकीला आली. रूपेश मधुकर मिलमिले (वय ३२, रा. चिंतलधाबा ) आणि शशिकला खुशाब कुसराम (वय २७ रा. भटारी) अशी मृतकांची नावे आहेत.

भटारी येथील शशिकला कुसराम आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहत होती. रूपेशने दीड वर्षांपूर्वी पत्नीला घटस्फोट दिला होता. रूपेश भाजीपाला विक्रीसाठी भटारी येथे जात होता. यादरम्यान त्यांचे सूत जुळले. मागील दीड वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते.

सोमवारला दुपारी शशिकला आणि रूपेश गणेश मिलमिले यांच्या शेतशिवाराकडे गेले. त्याच शेतातील विहिरीत रूपेशचा मृतदेह आढळला. शशिकला विहिरीच्या बाजूला मृतावस्थेत आढळली. या घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

मात्र, २८ मे रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांना आपला निर्णय फिरविला आणि चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतहेद शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. दुपारी तीन वाजताच्या सुमाराला त्यांचे शवविच्छेदन झाले. सकृतदर्शनी ही आत्महत्या वाटली.

मात्र, पोलिस तपासात आणखी काही धागेदोरे हाती लागले. ही हत्या असू शकते, असा पोलिसांना संशय आला. त्यामुळे चंद्रपूरला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दोघांचे शव हे संशयास्पद स्थितीत आढळून आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आता शवविच्छेदन अहवालातून समोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे, रायगड, नंदुरबारला अवकाळी पावसाने झोडपलं; राज्यात ढगाळ वातावरण, आंब्यासह रब्बी हंगामातील पिकं धोक्यात

१९ वर्षांपूर्वी सुरू झालेली चर्चा, आता निर्णय; भारत EU व्यापारी करारावर आज होणार शिक्कामोर्तब

IND vs NZ : न्यूझीलंडने 'वर्ल्ड रेकॉर्ड' होल्डर फलंदाज बोलावला, अभिषेक शर्माला देणार टक्कर; शेवटच्या २ सामन्यांसाठी संघ बदलला

Latest Marathi News Live Update : कुडाळ पणदूर तिठा येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग

Supreme Court मानवी हक्कांच्या रक्षणासाठी; केंद्र सरकारच्या हस्तक्षेपावर नाराजी? न्यायमूर्तींच्या विधानामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT