suicide  suicide
विदर्भ

एकमेकांच्या मिठीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या; विषारी औषध घेतले

एकत्र जगू शकत नसल्याने एकत्रच मृत्यू स्वीकारण्याचा निश्‍चय दोघांनी घेतला

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : विषारी औषध (Toxic drug taken) पिऊन प्रेमीयुगुलाने आत्महत्या (Lovers suicide) केली. ही घटना गुरुवारी (ता. १६) सकाळी सावळी दूरक्षेत्रमधील गुढा येथील गिढाई टेकडीजवळ उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. विशाल दत्ता आगीरकर (वय २८, रा. राणी धनोडा, ता. आर्णी) व पूनम संजय राऊत (वय १८, रा. बोंडगव्हाण) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही नात्यात येत असल्याने ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही सोबत जीवन जगण्याची शपथ घेतली. मात्र, प्रेमाला कुटुंबातून विरोध (Family's opposition to love) झाला. त्यामुळे विशाल व पूनम सोमवारी (ता. १३) घरून बाहेर पडले. दोन दिवस परिसरातच फिरले. एकत्र जगू शकत नसल्याने एकत्रच मृत्यू स्वीकारण्याचा निश्‍चय विशाल व पूनम यांनी केला.

बुधवारी (ता. १५) रात्री आर्णी तालुक्यात येणाऱ्‍या गिढाई टेकडीजवळ दोघांनीही विषारी औषध (Lovers suicide) प्याले. यातच त्यांचा मृत्यू झाला. एकमेकांना मिठी मारून मिठीतच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गुरुवारी (ता. १६) सकाळी घटना उघडकीस येताच खळबळ उडाली. पोलिस पाटील नितीन खोडे यांनी पारवा पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पारवा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन शेलुलकार व सुरेश येलपूरवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT