विदर्भ

Vidhan Sabha 2019 : नितीन राऊत यांना तिकीट दिल्यास बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 :
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्या माजी मंत्री नितीन राऊत यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नका, अशी मागणी उत्तर नागपुरातील नगरसेवकांनी दिल्ली येथे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली. 

विशेष म्हणजे सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राच्या उमेदवार छाननी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे यांची नियुक्ती केली. उत्तर नागपुरातील नगरसेवक दिल्लीत असून, ते विविध नेत्यांच्या भेटी घेत  आहेत. बुधवारी त्यांनी शिंदे यांची भेट घेतली. नगरसेवक मनोज सांगोळे यांनी आपल्याविरोधात राऊत यांनी काम केल्याचे सांगितले. आता त्यांनाच उमेदवारी दिल्यास एकही नगरसेवक व कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार नाही. उत्तर नागपूर भाग नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. ही जागा काँग्रेस जिंकण्याची आहे. त्याकरिता चांगला उमेदवार द्यावा. पुन्हा राऊत यांनाच तिकीट दिली तर आपण बंडखोरी करू, असा इशाराही सांगोळे यांनी दिला. राऊत यांना वगळून  कोणालाही तिकीट दिल्यास आम्ही त्याचा प्रचार करू, निवडूनसुद्धा आणू असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी उपस्थित काही कार्यकर्त्यांनी राऊत यांना तिकीट दिल्यास आम्ही पदाचा राजीनामा देऊ, असे सांगितले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी उत्तर नागपूरचा निर्णय घेताना सर्वांना विश्‍वासात घेतले जाईल. पक्षासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. परिस्थिती आणि मेरिट बघूनच येथे उमेदवार दिला जाईल, असे आश्‍वासन शिंदे यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT