संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

महापालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियान

कृष्णा लोखंडे

अमरावती : महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या सहभागातून निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्‍वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी "माझी वसुंधरा' हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात राज्यात अव्वल क्रमांक मिळावा, यासाठी कामांचे नियोजन आयुक्त प्रशांत रोडे यांनी प्रशासनाला दिले आहे.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्‍टोबर ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाचे मूल्यमापन होणार असून यासाठी विविध वर्गवारीत १५०० गुण आहेत. त्यामध्ये पृथ्वी ६०० गुण, वायू १०० गुण, जल ४०० गुण, अग्नी १०० गुण, आकाश ३०० गुणांचा समावेश आहे. पृथ्वी पंचतत्त्वांनुसार सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन नवीन हरितक्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी केले जाणार आहे. सुकळी कम्पोस्ट डेपो, अकोली रिंगरोड व कोंडेश्‍वर नाका येथे घनकचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे.

जल पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन तलावांसह सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. अग्नी तत्त्वांनुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर व बचत, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जेवर एलईडी दिवे लावण्याचे नियोजन आहे. विद्युत वाहनाकरिता चार्जिंग पाइंट निर्माण करण्यात येणार आहे. आकाश तत्त्वानुसार स्थळ आणि प्रकाश या स्वरुपात मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार व प्रचार केला जाणार आहे. महापालिका क्षेत्रात अनेक वस्त्यांचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी दिली.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT