ST Bus.jpg 
विदर्भ

‘एसटी’ला कोरोनाचा फटका!

अनुप ताले

अकोला : रेल्वेनंतर सर्वाधिक सुरक्षित व सोईस्कर प्रवास म्हणून, लोक एसटीला पसंती दर्शवितात आणि त्यातूनच दरवर्षी कोट्यवधीचे उत्पन्न महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्राप्त होत असतात. मात्र सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची धास्ती लोकांनी घेतल्याने, एसटीच्या प्रवाशी संख्येत लक्षणीय घट झाली असून, गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी, अवघ्या 13 दिवसात 70 लाख 23 हजार रुपयांनी उत्पन्न कमी झाले आहे.

रेल्वे पाठोपाठ जिल्ह्यातून दररोज हजारो लोक एसटीने प्रवास करतात. त्यासाठी दररोज शेकडो प्रवासी फेऱ्यांची सुविधा सुद्धा दिली जाते आणि त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा प्राप्त होत असते. गेल्या दोन आठवड्यापासून जगभरात ‘कोरोना व्हायरस’ने घातलेल्या थैमानाची धास्ती राज्यात आणि जिल्ह्यातही नागरीकांनी घेतली आहे. त्यामुळे गर्दीचे ठिकाण व प्रवास सुद्धा टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा परिणाम एसटी प्रवाशी संख्येवरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. परंतु, प्रवाशांनी घाबरुन न जाता, आरोग्य विभाग, शासनाकडून दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करुन आणि सुरक्षितता बाळगून प्रवास करण्याचा सल्ला विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी दिला आहे. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत महामंडळाकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे कळविले आहे.

प्रवाशांनी घाबरू नये, सुरक्षितता बाळगावी
‘एसटी’चा प्रवास खासगी वाहनांपेक्षा किती तरी पटीने सुरक्षित आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सदैव तत्पर असते. त्यामुळे सध्याही प्रवाशांना संसर्गजन्य आजाराची लागण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या खबरदाऱ्या घेतल्या जात आहेत. लवकरच एसटीच्या वाहकांजवळ सॅनिटायझर्स दिले जाणार आहेत. संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक सूचना ‘अनाऊंसमेन्ट’द्वारे दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घाबरू नये, सुरक्षितता बाळगावी.
- स्मीता सुतवाने, विभागीय वाहतूक अधिकारी, अकोला

सैलानी यात्रा रद्दचा मोठा फटका
दरवर्षी बुलडाणा जिल्ह्यात आयोजित होणारी सैलानी यात्रा, ‘कोरोना व्हायरस’चा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यशासनाच्या आदेशान्वये रद्द करण्यात आली. मात्र याचा मोठा फटका एसटीला बसला असून, या यात्रेतून येणारे जवळपास 25 लाखाचे उत्पन्न यंदा महामंडळाला मिळू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT