nana patole 
विदर्भ

'सुरजागड पहाडावरील एक दगडही उचलू देणार नाही'; नाना पटोले संतापले

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या (Gadchiroli district) एटापल्ली (Etapalli) तालुक्यातील सुरजागड (Surjagadh) पहाडावरील लोहखनिज उत्खनन (Iron ore mining) करण्यापूर्वी येथे प्रक्रिया प्रकल्प उभारावा, त्यानंतरच उत्खनन करावे, अशी स्पष्ट भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मांडली होती. असे असतानाही राज्य सरकारला अंधारात ठेवून या पहाडावर उत्खनन होत असल्याचे माहिती झाले आहे. हा गैरप्रकार असून आम्ही सुरजागड पहाडावरील एक दगडही उचलू देणार नाही. आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तिथे जाऊन आंदोलन करतील, अशी संतप्त प्रतीक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी येथे व्यक्त केली. (Make project of iron ore at Surjagadh before mining said nana patole)

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार अभिजित वंजारी, माजी खासदार मारोतराव कोवासे, राजाभाऊ तिडके, रवींद्र दरेकर, डॉ. प्रमोद साळवे, जेसा मोटवानी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत सुरजागड येथे सुरू असलेल्या उत्खननासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर नाना पटोले म्हणाले की, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. त्या बैठकीत आधी सुरजागडच्या लोहखनिजावर प्रक्रिया करणारा प्रकल्प जिल्ह्यात उभारायचा व त्यानंतर उत्खनन करायचे, अशी स्पष्ट भूमिका आम्ही मांडली होती. पण, येथे उत्खनन सुरू असल्याचे कळल्यामुळे धक्का बसला आहे. हे उत्खनन बंद करू. प्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे जाऊन आंदोलन करतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. सध्या केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशात पेट्रोल, डिझेलची दरवाढ झाली असून महागाईचा आगडोंब उसळला आहे.

तसेच कोरोनाचे संकट मानवनिर्मित असून पंतप्रधानांनी अमेरीकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना देशात वाजतगाजत आणले, कोरोनाची दुसरी लाट असतानाही निवडणुका घेतल्या. मात्र,मार्चमध्ये दुसरी लाट येऊ घातली असताना देश कोरोनामुक्त झाल्याची टिमकी वाजवली. त्यामुळे हे संकट गंभीर झाल्याची टीका त्यांनी केली.

जनगणनेसाठी केंद्रातील सरकार बदला

आज राज्यात सत्ताधारी पक्षात असलो, तरी मी ओबीसी नेताच आहे. आजपर्यंत ओबीसींच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे. ओबीसी जनगणनेचा ठराव मी स्वत: आणला होता. पण, केंद्राने ओबीसी जनगणनेला नकार दिला. त्यामुळे आता ओबीसी जनगणना व्हायची असेल, तर ओबीसींसह सर्वांनी एकत्र येत केंद्रातील सरकार बदलणे गरजेचे आहे, असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

(Make project of iron ore at Surjagadh before mining said nana patole)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत प्रभाग 59 मध्ये एकूण 24896 मतदान, 11 उमेदवार मैदानात... कोण जिंकणार?

BMC Election Result : मुंबई कुणाची? मतमोजणीला सुरुवात, पहिले कल आले समोर

Kolhapur Municipal Election Results : कोल्हापुरात मतमोजणीला सुरूवात, सजेत पाटील, धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागरांची प्रतिष्ठा पणाला

Gold Rate Today : राज्यात महापालिका निकालाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! चांदीही घसरली; खरेदी करण्याआधी पाहा आजचे भाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौरांसह शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप, मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT