Malaria and Dengue are increasing in Amravati after corona
Malaria and Dengue are increasing in Amravati after corona  
विदर्भ

कोरोनानंतर आता चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंगीचा हाहाकार; साथरोग नियंत्रणाबाबत आरोग्ययंत्रणा गंभीर नसल्याचे चित्र 

कृष्णा लोखंडे

अमरावती ः स्वच्छ सर्वेक्षणाचा डंका पिटल्या जात असलेल्या महानगरात कोरोना संक्रमणासोबतच डेंगी, मलेरिया व चिकूनगुनियाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आरोग्ययंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर येऊ लागली आहे. मात्र कोरोना वगळता इतर साथरोगांच्या नियंत्रणासाठी आरोग्ययंत्रणा हवी तितकी गंभीर नसल्याचे चित्र आहे.

शहरात डेंगीचे 116 तर मलेरियाचे 10 व चिकुनगुनियाचे 23 रुग्ण आढळले आहेत. कोरोना संक्रमित रुग्ण दररोज आढळत असतानाच मलेरिया व चिकुनगुनियासह डेंगीने डोके वर काढत महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह लावले आहे. मलेरियाचा प्रकोप कमी दिसत असला तरी साथरोगांच्या श्रेणीतील हा आजार बळी घेणारा आहे. 

दरवर्षी या आजाराने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आरोग्ययंत्रणांनी घेतलेल्या 2 लाख 46 हजार 498 रक्तनमुन्यांत बाधित रुग्ण केवळ दहा इतकेच आढळले आहेत, तर मलेरियासोबतच चिकुनगुनिया हा आजार पुन्हा शहरात फैलू लागला आहे. आतापर्यंत या आजाराचे 23 रुग्ण आढळले असून त्यातील 14 रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहे. तर ग्रामीण भागात नऊ रुग्ण सापडले आहेत. 1481 रक्तनमुने घेण्यात आले होते.

डेंगीचा प्रादुर्भाव मात्र वाढता आहे. महापालिका क्षेत्रात 116 रुग्णांची नोंद आहे. आरोग्ययंत्रणांनी घेतलेल्या 1481 रक्तनमुन्यात हे रुग्ण बाधित असल्याचे समोर आले आहे. तीनही साथरोगांनी शहरातील आरोग्य व्यवस्था व स्वच्छता यावर प्रश्‍नचिन्ह लावले आहे. विशेष म्हणजे महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षणाचा डंका सध्या पिटल्या जात आहे. रोज प्रभागाप्रभागांमध्ये विविध कार्यक्रम घेत फोटोसेशन सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT