man and his son died due to drowning in river in amravati 
विदर्भ

अधिक मासाची पूजा बेतली जीवावर, बापलेकांचा नदीत बुडून मृत्यू

सुरेंद्र चापोरकर

असदपूर (जि. अमरावती): जिल्ह्यातील निंभारी गावाजवळ सापन नदीत बुडून बापलेकाचा मृत्यू झाला आहे. अधिक मासाच्या पूजेचे साहित्य शिरवायला गेले असता मंगळवारी(ता. २९)दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आर्यन अमोल गोळे (वय 13) आणि अमोल ऊर्फ बबलू रमेश गोळे, अशी मृत बापलेकांची नावे असून दोघेही कोल्हा येथील रहिवासी होते. अमोल गोळे हे मुलगा आर्यन व कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक मास असल्याने पूजेचे साहित्य शिरविण्यासाठी निंभारी येथून वाहणाऱ्या सापन नदीवर गेले होते. पूजेचे साहित्य सोडल्यावर मुलगा आर्यन व अमोल गोळे हे नदीच्या काठावरच आंघोळ करीत होते. मात्र, मुलाचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडायला लागला. त्यामुळे वडिलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. शिवाय तेथेच भलामोठा खड्डा असल्याने त्यात दोघेही बुडायला लागले. कुटुंबातील महिलांनी आरडाओरड केली. मात्र, तेथे कुणीच नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

गोळे यांच्या कुटुंबातील महिलांनी घटनेची माहिती निंभारी येथील नागरिकांना दिली. तेव्हा घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. लागलीच आसेगावपूर्णा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावरून ठाणेदारांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने गोळे पितापुत्रांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. पंचनामा करून मृतदेहांना अचलपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. एकाच वेळी बापलेकाचा मृत्यू झाल्याने गोळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट ! सियाला केतनसोबत लोहगडावर जायचे नव्हते, पण... आईचा मोठा दावा

Music Benefits: गाण्यामुळे मनाला का मिळते एवढी शांतता ? जाणून घ्या,'म्युझिक थेरपी'मागचं विज्ञान...

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Hinjewadi Metro: प्रवाशांना मोठा दिलासा! हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी चौदा मार्गांवर बससेवा; दोन कंपन्यांशी करार, पहिल्या टप्प्यात २० बस

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT