man attacked on man in yavatmal
man attacked on man in yavatmal  
विदर्भ

सतत फोन करून त्रास देत असल्याचा राग अन् दिग्रसमध्ये घडली अंगावर शहारे आणणारी घटना 

सकाळ डिजिटल टीम

दिग्रस (जि. यवतमाळ)  : फोनद्वारे त्रास देत असल्याच्या क्षुल्लक कारणातून वाद करीत तरुणाच्या डोक्‍यावर सेंट्रीग लाकूडचा हल्ला करून खून केला. ही घटना सोमवारी (ता.एक) सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान घडली. या घटनेने आरंभी येथे एकच खळबळ उडाली.

रामेश्‍वर प्रेमसिंग पवार (वय 28, रा. आरंभी), असे मृताचे नाव आहे. तरुण गजानन राठोड याला मोबाइलवर फोन करून त्रास देत होता. या कारणातून रस्त्यावर रामेश्वर व गजानन राठोड यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. 

सेंट्रीग लाकडाचा घाव डोक्‍यावर बसल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी दिग्रस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री साडेनऊ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी भारत पवार याने दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

त्यावरून गजानन राठोड, दीपक राठोड (वय 42), माणिक राठोड (वय 38, सर्व रा. आरंभी) यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्घ गुन्हा नोंदविला. दिग्रस पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृताच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात रवींद्र जगताप, नरेंद्र पुंड, ब्रह्मदेव टाले करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT