man attacked on a person in yavatmal district
man attacked on a person in yavatmal district  
विदर्भ

मुलकीत तरुणाचा निघृण खून; मित्रासमोरच धारदार शस्त्राने केले वार

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका 22 वर्षीय तरुणावर दोघांनी धारदार शस्त्राने वार करीत त्याची निघृण हत्या केली. ही खळबळजनक घटना शहरातील वडगाव भागात असलेल्या मुलकीतील एका टॉवरजवळ सोमवारी (ता.15) रात्रीच्या सुमारास घडली. प्रफुल उर्फ बाबू गणेश बडदे (वय 22, रा. मुलकी) असे मृताचे नाव आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वडगाव परिसरातील मुलकी भागात प्रफुल उर्फ बाबू बडदे हा कुटुंबीयांसह राहात होता. तो मजुरीचे काम करायचा. सोमवारी बाबू बडदे याचा मित्र दुर्गेश ढोले याचा गोलू उर्फ सुरेश घायवान याच्यासोबत जांब येथे वाद झाला. 

ही बाब दुर्गेश याने बाबूला सांगितल्याने रात्री 9.30 वाजताच्या सुमारास वाद मिटविण्यासाठी बाबू बडदे, दुर्गेश ढोले काही मित्रांसह जांब येथे गेले. दरम्यान त्या ठिकाणी सतीश कुचनकर आणि गोलू उर्फ सुरेश घायवान यांच्यासोबत पुन्हा वाद झाला. त्यानंतर बाबू बडदे, दुर्गेश ढोले आणि त्याचे साथीदार परत मुलकी येथे आले. रात्री 12 वाजताच्या सुमारास प्रफुल उर्फ बाबू बडदे हा टॉवरजवळ झोपला होता, त्यावेळी त्याचा मित्र दुर्गेश ढोले आणि इतर साथीदार तिथेच एका लाईटजवळ उभे होते. 

अश्‍यातच सतीश कुचनकर आणि गोलू उर्फ सुरेश घायवान दोघे त्या ठिकाणी दुचाकीने आले आणि त्यांनी झोपेत असलेल्या बाबू बडदे याच्या तोंडावर, मानेवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करीत त्याची निघृण हत्या केली. यावेळी दुर्गेश ढोले आणि त्याच्या मित्रांनी घाबरून त्या ठिकाणाहून पळ काढला. ही बाब दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.16) सकाळी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. यावेळी त्या परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांसह नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह एलसीबीतील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. 

या प्रकरणी सचिन गणेश बडदे (वय28) याने दिलेल्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी सतीश कुचनकर (रा. दांडेकर ले-आऊट) आणि गोलू उर्फ सूरज घायवान (रा. राधाकृष्ण नगरी) या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT