man attempt to murder of farmer in amravati  
विदर्भ

बैलगाडी खाली करत होता शेतकरी, अचानक सात जण आले अन् उडाला अंगाचा थरकाप

संतोष ताकपिरे

अमरावती : जिल्ह्याच्या वडनेरगंगाई गावात रस्त्याच्या वादातून कीटकनाशक पाजून हत्येचा प्रयत्न झाला. शेख आदिल उर्फ शेख चांद शेख कालू (वय 38, रा. वडनेर गंगाई), असे प्रकृती गंभीर असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

येवदा पोलिसांनी शेख आदिल यांच्या तक्रारीवरून मोहंमद कासम, मो. इब्राहीम, मो. कय्युम, मो. फिरोज, फयाजउद्दीन, मो. फारुक, वसीमोद्दीन (सर्व, रा. वडनेर गंगाई) अशा सात जणांविरुद्ध शनिवारी (ता. सहा) गुन्हा दाखल केला. रविवारपर्यंत (ता. सात) त्यापैकी कुणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी (ता. 5) शेख आदिल हे बैलगाडीमधील कुटार खाली करत होते. त्यावेळी मो. कासम हे शेख आदिल यांचे घरासमोरच्या रस्त्यावरून जात होते. घराच्या आवारातून जाण्याबाबत संबंधितास हटकले असता, त्यांनी वाद घातला. सातही जणांनी शेख आदिल यांना आधी पकडून ठेवले नंतर त्यापैकीच एकाने आपल्या घरामधुन कीटकनाशक आणले. हे कीटकनाशक शेख आदिल यांना बळजबरीने पाजून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. सदर व्यक्तीची पत्नी सईदा बी शेख आदिल यांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर सातही जणांनी तेथून पळ काढला, असा आरोप शेख आदिल उर्फ शेख चॉंद यांनी येवदा ठाण्यात दाखल तक्रारीत केला. त्याआधारे नमुद व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT