Man commits suicide by jumping into a well in Amravati crime news 
विदर्भ

दोन वर्षांपासून पत्नी, मुलगी जवळ राहत नसल्याचे घेतले मनावर; रागारागात घेतला हा निर्णय

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : येथील ग्रामीण रुग्णालय जवळ असलेल्या एका शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन ४० वर्षीय इसमाने आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. प्रशांत मुकुंदराव गोरडे (रा. होळकर चौक, तिवसा) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवसा ग्रामीण रुग्णालयानजिक असलेल्या श्रीराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत गोरडे यांनी पहाटे उडी घेऊन आत्महत्या केल्याची बाब आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पाश्चत पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.

तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीत असलेला मृत्यूदेह बाहेर काढला. तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छदानासाठी पाठविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहे.

मृत प्रशांत गोरडे यांच्या वडिलांच्या नावाने अडीच एकर शेत आहे. ते शेतातील सर्व कामे करीत होते. मात्र, दोन वर्षांपासून पत्नी व मुलगी जवळ नसल्याने ते मानसिक तणावात असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा पाऊल उचला असावा अशी चर्चा देखील होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT