Accident Accident
विदर्भ

आईच्या मृत्यूला न आलेला मुलगा दशक्रियेला आला अन् गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा

आंजी (मोठी) (जि. वर्धा) : आईच्या दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी आलेला तरुण आपल्या परिवारासह ऑटोने गावी जात असताना ऑटोला ट्रॅक्टरने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. राजू पंजाबराव घोगले (वय ५१, रा. बोरगाव, सावळी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना धुळवा फाट्याजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

राजू हा गुजरात राजकोट येथे एका कंपनीत काम करतो. त्याची आई बोरगाव येथे राहात होती. तिच्या मृत्यूच्या वेळी येणे झाले नसल्याने तो दशक्रियेच्या कार्यक्रमाला पोहोचण्याचे नियोजन करून गुजरात येथून आला व गावी म्हणजे बोरगाव सावळी गाठण्यासाठी आंजी येथून किरायाने ऑटो केला. दरम्यान, धुळवा फाट्याजवळ बोरगाव येथून एक अज्ञात ट्रॅक्टर भरधाव वेगाने आंजी मोठीकडे येत होता. त्याच दरम्यान आंजी मोठी येथून जाणाऱ्या ऑटोला त्याने जबर धडक दिली. यात राजू घोगले गंभीर जखमी झाला, तर त्याची पत्नी अंजनादेखील जखमी झाल्या.

त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यात राजू घोगले यांचा मृत्यू झाला. पत्नी गंभीर जखमी आहे. ट्रॅक्टरचालक हा घटनास्थळ सोडून पसार झाला. घटनेची माहिती खरांगणा पोलिस ठाण्याला मिळताच ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंजी पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद खुरसुंगे व आंजी पोलिस चौकीचे बीट जमादार संतोष कांबडी, शिपाई किशोर बमनोटे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT