man died by drowning in river in ballarpur of chandrapur 
विदर्भ

मित्राचा फोन बेतला जीवावर, एकुलता एक तरुण मुलगा गमावल्यानं आई-वडिलांनी फोडला हंबरडा

सकाळ वृत्तसेवा

बल्लारपूर ( जि. चंद्रपूर ) : रंग खेळून मित्रांसोबत नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. 29 मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ऋषिकेश संजय कोतपल्लीवार (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

सोमवारी रंगपंचमीचा दिवस होता. ऋषिकेश आपल्या मित्रांसोबत घराशेजारीच रंग खेळत होता. बराचवेळ रंग खेळून झाल्यावर तो घराकडे जाण्यासाठी निघाला. वाटेतच त्याला त्याच्या मित्राचा फोन आला. त्यामुळे कुटुंबाला माहिती न देताच ऋषिकेश मित्रासोबत वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेला. तेथेच त्याचा खोल पाण्यात तोल गेला. पाण्यात बुडून मृत्यू झाला. घडलेल्या घटनेची माहिती मित्रांनी कोतपल्लीवार कुटुंबांना दिली. कुटुंबातील एकुलता एक तरुण मुलगा अचानक गेल्याने कोतपल्लीवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहेत. या घटनेची माहिती वडील संजय कोतपल्लीवार यांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी अल्पावधीतच मृत ऋषिकेशचा शोध घेतला. शवविच्छेदनासाठी शव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा उपसमितीने पाठविला, मनोज जरांगे काय निर्णय घेणार?

सुपरस्टार अभिनेत्रीची उत्तरार्धात झाली दुर्दशा ! रक्ताच्या उलट्या अन् कर्करोग; अंत्यदर्शनाला बहीणही नाही आली

Latest Marathi News Updates: मराठा समाज आक्रमक; CSMT रोड वर CRP तुकड्या व अश्रूधुराच्या नळकांड्या तैनात

Manoj Jarange : परवानगी नाही... मुंबई खाली करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊन खात्री करु... मुंबई हायकोर्टाचं परखड मत

6,6,6,6,6,6,6... पोलार्डचं वादळ! ८ चेंडूत ठोकले तब्बल ७ षटकार, Video Viral

SCROLL FOR NEXT