man died in road accident at dhamangaon railway of amravati 
विदर्भ

आजारी जावयाच्या भेटीला निघाले होते सासरे, वाटेतच काळाने घातली झडप

कृष्णा लोखंडे

धामणगावरेल्वे  (जि. अमरावती): धामणगावातील आयुर्विमा अभिकर्त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. गजानन जाजू (वय ५४), असे मृताचे नाव आहे. जावई आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी अदिलाबाद येथे दुचाकीने जात असताना यवतमाळजवळ अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. नागपूरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे जावयांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याचे बोलले जात आहे.

आयुर्विमा अभिकर्ता गजानन जाजू हे आपल्या जावयाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी धामणगाव येथून 10 ऑक्‍टोबरला दुचाकीने आदिलाबाद येथे जात होते. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील मौदा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात जाजू यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. आधी त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी (ता.13) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. धामणगाव येथील मोक्षधामात त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी, दोन भाऊ व बहिणी, असा आप्त परिवार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT