file photo
file photo 
विदर्भ

पोलीस ठाण्याच्या आवारात विषप्राशन, उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : वणी पोलीस ठाण्याच्या आवारात चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्‍यातील गाडेगाव येथील व्यक्तीने मंगळवारी (ता.25) दुपारी 4 वाजता विषप्राशन केले होते. उपचारादरम्यान त्याचा चंद्रपूर येथे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
मारुती उर्फ बंडू भोनसाजी सुरपाम असे विषप्राशन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो सासू, सासऱ्यासह वणी येथे बचत ठेवीचे पैसे काढण्यासाठी आला होता. परंतु पैसे न काढताच तो वणी पोलीस ठाणे परिसरात फिरत होता. काही वेळाने त्याने पोलीस ठाण्याच्या आवारातील दक्षता भवनच्या दरवाज्याजवळ विष प्राशन केले. तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मारुती पोलीस ठाण्यात नेमका कशाला आला होता, त्याने विष कोठून आणले, असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे. मारुती सुरपामच्या मृत्यूमुळे नातेवाईक व आदिवासी संघटनांनी रोष व्यक्त करीत मृतदेह वणी ठाण्यात आणून कारवाईची मागणी केली.
बिरसा ब्रिगेडची ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी
मारुती सुरपाम पत्नीला भेटायला वणी येथे आला होता. काही कारण नसताना पोलिसांनी त्याला अमानुष मारहाण केली. प्रकृतीत चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूरला हलविले असता त्याचा मृत्यू झाला. याला वणीचे ठाणेदार वैभव जाधव व त्यांचे रायटर जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी बिरसा ब्रिगेडने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT