{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612447050182,"A":[{"A?":"I","A":28.099749473002397,"B":755.8908094198471,"D":183.01241638660468,"C":51.800501053995205,"F":0.04,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM 
विदर्भ

'आई या जगात नाही आता जगून काय करू?'  नैराश्यातून युवकानं संपवली जीवनयात्रा; अख्ख्या शहरात हळहळ 

दीपक फुलबांधे

भंडारा : शहरातील खात रोड परिसरातील युवकाने वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. मृताचे नाव सारंग देशमुख (वय 39) असे आहे.

शहरापासून जवळ असलेल्या वैनगंगा नदीत पहाटेपासून पोहणारे व नदीकाठावर व्यायाम करणाऱ्यांची गर्दी असते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास नदीच्या पाण्यात मृतदेह असल्याचे पोहणाऱ्यांना आढळून आले. याबाबत त्यांनी कारधा पोलिसांना माहिती दिली. कारधा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सदर ठिकाण भंडारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगितले. त्यानंतर भंडारा पोलिसांना माहिती देण्यात आली. 

पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह काठावर आणण्यात आला. तेव्हा खातरोड परिसरातील लक्ष्मीनगर येथील सारंग प्रभाकर देशमुख याचा मृतदेह असल्याची ओळख पटली. त्यानंतर नातेवाइकांना सूचना देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी वैनगंगा नदीच्या जुन्या पुलावर मोठी गर्दी जमली होती.

सदर युवक केबल ऑपरेटरजवळ सहायक म्हणून काम करत होता. मात्र, कोविड परिस्थितीत त्याच्या आईचा मृत्यू झाला व रोजगार गेल्याची माहिती आहे. यातील नैराश्‍यातून त्याने बुधवारी वैनगंगा नदीच्या पात्रात आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. भंडारा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, तपास सुरू आहे.

बॅकवॉटरमुळे सुसाईड पॉइंट

गोसेखुर्द धरणात पाणी अडविण्यात आल्यापासून शहराजवळीत वैनगंगा नदीचे पात्र आत्महत्या करण्याचे केंद्र ठरले आहे. नदीच्या पात्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर असून नवीन व जुन्या अशा दोन्ही पुलाजवळील पात्रात उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या विस्तीर्ण नदीपात्रावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती अशक्‍य ठरणारी बाब आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT