man gave threat to brother of a girl  
विदर्भ

"मधे आलास तर, तिला पेट्रोल टाकून जाळेन:; युवतीच्या भावाला दिली धमकी 

संतोष ताकपिरे

अमरावती ः ती मला आवडते, परंतु तू जर दोघांच्या मधे आलास तर तिला पेट्रोल टाकून जाळून टाकेल, अशी धमकी टवाळखोराने पीडित युवतीसह समजूत काढण्यासाठी गेलेल्या तिच्या भावाला दिली. पीडितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय सुरेश रत्नपारखी (वय 25, रा. न्यू कॉलनी, दस्तूरनगर) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. असे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी रविवारी (ता. आठ) सांगितले. 

अक्षय व पीडित युवती दोघांनी शालेय शिक्षण एकाच शाळेत घेतले. अक्षयने पीडित युवतीचा फोटो वापरून तिच्या नावाने फेसबुक अकाउंट तयार केले. त्यावर पीडितेच्या नावासमोर अक्षयने स्वत:चे नाव व अडनाव लिहिले होते. त्यावर वेगवेगळ्या प्रकारे अश्‍लील मॅसेज व फोटो पाठवून तिची बदनामी केली. युवतीने आपल्या कुटुंबीयांना त्यासंदर्भात माहिती दिली. 

तिच्या भावाने याप्रकाराबाबत अक्षयची भेट घेऊन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र  ती मला आवडते. आमच्या दोघांच्या मधात आलास तर तिला पेट्रोल टाकून जाळेन, अशी धमकी भावालाच त्याने दिली. फेसबुकसह इन्स्टाग्रामवरसुद्धा तिची बदनामी केली. पीडितेने अखेर यासंदर्भातील तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदवली. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अक्षय रत्नपारखीला अटक केली.

लग्नास नकार दिल्याने युवतीस मारहाण

परतवाडा ठाण्याच्या हद्दीत हनवतखेड्यात संशयित आरोपी कैलास खांडेकर (वय 25) याने युवतीपुढे (वय 22) लग्नाची मागणी केली. नकार दिल्यामुळे तिला बदनामीची धमकी देऊन जबर मारहाण केली. पीडितेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी कैलासविरुद्ध विनयभंग, मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सोशल मीडियावरून बदनामी केल्याचे काही तांत्रिक पुरावे तक्रारीसोबत पीडितेने सादर केले. तक्रार गंभीर स्वरूपाची असल्यामुळे युवकाविरुद्ध तत्काळ कारवाई केली.
-पुंडलिक मेश्राम, 
पोलिस निरीक्षक फ्रेजरपुरा ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशाच्या राजकारणात मोठा बदल... विरोधकांना कमजोर समजणं NDAला पडलं महागात? दोन-तृतीयांश बहुमताचं स्वप्नाचं काय झालं?

Post Office Scheme: FD पेक्षा भारी ही पोस्टाची स्कीम? फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक अन् 7.5% व्याजदर? पाहा संपूर्ण गणित

Riddhi Thakkar: लेकीचा मृतदेह आणायला जन्मदात्याचा १००० किमी प्रवास, समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : नाशिक पुन्हा हादरलं! ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

SCROLL FOR NEXT