corona  PASIEKA
विदर्भ

हृदयद्रावक! उपचाराअभावी कोरोनाग्रस्तानं प्रवासी निवाऱ्यात तडफडून सोडले प्राण; ब्रह्मपुरीतील घटना

सकाळ डिजिटल टीम

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : शहरातील ख्रिस्तानंद चौकातील दवाखान्यालगत असलेल्या बसस्थानकाच्या प्रवासी निवाऱ्यात एका कोरोनाबाधिताचा उपचाराअभावी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १८) सकाळच्या सुमारास उजेडात आली. मृताचे नाव गोविंदा बळीराम निकेश्‍वर (वय ५०, रा. आंभोरा, जि. नागपूर) असे आहे.

गोविंदा निकेश्‍वर हे मूळचे भिवापुरातील आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांना भिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. एक-दोन दिवस तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, श्‍वास घेताना त्यांना त्रास जाणवू लागला. प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्‍सिजनची व्यवस्था नव्हती. त्यामुळे शुक्रवारी (ता. १७) रात्री रुग्णवाहिकेने गोविंद निकेश्‍वर यांना ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, तेथे अगोदरच पंचेवीस रुग्ण असल्याने निकेश्‍वर याला भरती करून घेण्यात आले नाही.

त्यानंतर निकेश्‍वर यांच्या नातेवाइकांनी शहरातील अन्य दवाखानेही बघितले. मात्र, त्यांची कोणतीच सुविधा होऊ शकली नाही. त्यामुळे ते ख्रिस्तानंद चौकात असलेल्या प्रवासी निवाऱ्याजवळच थांबले. त्यावेळी निकेश्‍वर यांची पत्नी, आईवडील आणि काही नातेवाईक होते. रात्रभर निकेश्‍वर आणि त्यांचे नातेवाईक प्रवासी निवाऱ्याजवळ थांबून होते.

रविवारी सकाळी एक रुग्ण उपचारासाठी प्रवासी निवाऱ्यात तडफडत पडला असल्याचे काही लोकांना दिसले. याची माहिती नागरिकांनी तहसीलदार विजय पवार यांना भ्रमणध्वनीवर दिली. माहिती मिळताच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपस्थित अधिकाऱ्यांनी लगेच जवळच्या ख्रिस्तानंद रुग्णालयातील रुग्णवाहिका व डॉक्‍टरांना बोलावून घेतले. सदर रुग्णाला कुठे भरती करता येईल काय, याबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली. डॉक्‍टर येण्याअगोदरच रुग्णाचे निधन झाले.

मृत हा मूळचा भिवापुरातील आहे. त्याच्यावर भिवापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. मात्र, तेथील ऑक्‍सिजन संपल्याने त्याला रेफर करण्यास सांगण्यात आले. त्याचे नातेवाईक त्याला ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद रुग्णालयात घेऊन आले. मात्र, तेथे अगोदरच पंचेवीस रुग्ण वेटिंगवर होते. त्यामुळे त्याला दाखल करून घेतले नाही. सकाळी रुग्ण प्रवासी निवाऱ्यात असल्याची माहिती मिळताच आम्ही पोहोचलो. त्याला अन्य ठिकाणी हलविण्यासाठी हालचाली सुरू असतानाच त्याचा जीव गेला.
- क्रांती डोंबे,उपविभागीय अधिकारी, ब्रह्मपुरी.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT