Man misbehaved with 4 years old girl in bhandara district  
विदर्भ

चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; तुमसर तालुक्यातील मांढळ येथील घटना  

चंद्रशेखर साठवणे

मोहाडी (जि. भंडारा) : चॉकलेट खाऊ देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन  एका ४ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुमसर तालुक्यातील मांढळ येथे घडली . बलात्कार करणाऱ्या नराधमाला मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लक्ष्मीकांत सेलोकर रा. मांढळ असे आरोपीचे नाव आहे. 

मांढळ गावातील पीडित मुलगी आणि आरोपी, वय वर्ष ३१, हे शेजारी शेजारी राहतात. घटनेच्या दिवशी पीडीत मुलगी घराशेजारी सुरु असलेल्या हवन कार्यक्रमासाठी गेली होती. त्यानंतर प्रसादासाठी भावाला घेवून येते म्हणून घरी परत आली. 

भाऊ झोपलेला असल्याने आईने तिला 'तू प्रसाद घेवून ये ' असे सांगितले.  मुलगी पुन्हा प्रसाद घेण्याकरिता शेजारच्या घरी गेली. बराच वेळ ती परत न आल्याने आईने शोध सुरू केला. काही वेळानंतर  मुलगी शेजारच्या युवकासोबत घराकडे येताना दिसली. ती रडत असल्याने आईने तिला विचारणा केली. 

तिने आरोपी लक्ष्मीकांत उर्फ छोटू सीताराम सेलोकर याने चॉकलेट देतो असे म्हणून  त्याने तिला जवळच बांधकाम सुरु असलेल्या एका घरी नेवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे तिने आईला सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबीय हादरले आणि त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. 

या प्रकरणाची तक्रार मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून आरोपी विरुद्ध ३७६,ए,बी, भांदवि, सहकलम ४,६,८, बाललैन्गिक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलिस नायक मिथुन चांदेवार करीत आहेत.  

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT