man throw daughter on door in Gondia district  
विदर्भ

काळजाचे तुकडे करणारी घटना! क्रूर बापानं चिमुकलीला आदळलं दारावर; क्षणाधार्त होत्याचं झालं नव्हतं

चित्रा कापसे

तिरोडा ( जि. गोंदिया) : रागाच्या भरात कोण कधी आणि काय करेल काहीही सांगत येत नाही. एकदा राग अनावर झाला कि आपण काय करतोय स्वतःच स्वतःला कळत नाही. मात्र गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. स्वतःच्या मुलीसोबत एका क्रूर बापानं अक्षरशः अमानुष कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.  

विनाकारण रडते म्हणून, रागाच्या भरात वडीलाने पोटच्या मुलीला दरवाजावर आदळले. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील लोणारा येथे घडली. वैष्णवी विवेक उईके ( वय एक वर्ष आठ महिने) असे मृत मुलीचे नाव असून, पोलिसांनी आरोपी वडीला विवेक उईके ( वय 28, रा.लोणारा) याला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

वैष्णवी रडत असल्याने तिच्या आईने पती विवेक उईके याला खाऊसाठी पाच रुपये मागितले. मात्र, त्याने पैसे दिले नाही. याचवेळी मुलगी वैष्णवी ही जोरात रडत होती. त्यामुळे विवेकने विनाकारण रडते म्हणून तिला उचलून दरवाजावर आदळले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.  

या घटनेची तक्रार पोलिसांत करण्यात आली असून, पोलिसांनी  खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपी विवेक उईके याला अटक केली आहे.  पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर हनवते करीत आहेत.


संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT