man who theft keys from SP office is mentally unstable  
विदर्भ

अखेर छडा लागला! यवतमाळ पोलिस अधीक्षक कार्यालयातून चावीचा गुच्छा चोरणारा निघाला मनोरुग्ण 

राजकुमार भितकर

यवतमाळ : येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात बॉक्‍समध्ये ठेवून असलेला चाबींचा गुच्छा चोरी झाल्याची घटना शनिवारी (ता. पाच) सकाळी उघडकीस आली होती. पोलिस उपअधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी चालविलेल्या शोध मोहिमेत चाबींचा गुच्छा चोरी करणारा चक्क "मनोरूग्ण' निघाला.

अजिंदर भोसले (वय 35, रा. आजंती बेडा, ह.मु. तलावफैल), असे संशयिताचे नाव आहे. तो वेडसर असल्याने कुठेही फिरत रहायचा. एसपी कार्यालयात शिरून त्याने चाबींचा गुच्छा चोरी केला होता. पोलिस अधीक्षक कार्यालयात स्टेनो कक्ष, रीडर ब्रॅंच, मंथन हॉल, अभ्यागत कक्ष, अर्जशाखा, लेखाशाखा, आस्थापना शाखा, पत्रव्यवहार शाखा, जावक शाखा, सायबर सेल आदी कक्षांच्या चाब्या स्वागतकक्षाच्या जिन्याजवळ असलेल्या बॉक्‍समध्ये संबंधित विभागाचे कर्मचारी लावून ठेवतात. 

शनिवारी सफाई कामगार पांडुरंग गवळी हे कार्यालयाच्या सफाईसाठी आले असता, त्यांना बॉक्‍समध्ये एकही चाबी दिसली नाही. शोधाशोध करूनही चाब्या दिसल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यावरून एसपी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविण्यात आले होते. 

पोलिस उपअधीक्षक बाविस्कर यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. चाबींचा गुच्छा चमेडीयानगरात फेकून देताना अजींदर काही लोकांना दिसला होता. लहान मुलांनी चाबींचा गुच्छा भंगारात विक्री केल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध घेत संशयिताला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्यासह डिबी पथकाने केली.

पोलिस अधीक्षक कार्यालयातून चाबींचा गुच्छा चोरी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयापुढे त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाने आज त्याची रवानगी नागपूर येथील मनोरूग्णालयात करण्यात आली.
- धनंजय सायरे
ठाणेदार, शहर पोलिस ठाणे, यवतमाळ.

संपदान- अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT